गोविंदाच्या तालावर विद्यार्थ्यांची धूम

लोणावळा, संपादक : संजय पालवे 
      विद्या प्रसारिणी सभेच्या व्ही.पी.एस हायस्कूल व द.पू.मेहता कनिष्ठ महाविद्यालयामध्ये दहीहंडीचा कार्यक्रम उत्साहात पार पडला.   https://youtu.be/GqZzO8MPW7Y?si=jELdfgVZT4A2pjHl
     दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दहीहंडी उत्सवा निमित्ताने प्रशालेमध्ये विद्यार्थ्यांसाठी दहीहंडीचे आयोजन करण्यात आले. यासाठी इयत्ता पाचवी अ आणि ब च्या विद्यार्थ्यांनी विविध वेशभूषा परिधान केली. यावर्षी राधा आणि कृष्ण बनण्याचा मान चि.राजवीर पवार आणि कु.रेवा राऊत यांना मिळाला.
     इयत्ता पाचवी ते आठवी विद्यार्थ्यांना दहीहंडीला सलामी देण्याची संधी देण्यात आली. त्यासाठी विद्यार्थ्यांनी तीन स्तरापर्यंत उंची गाठत दहीहंडीला सलामी दिली. शेवटी आठवी इ मधील विद्यार्थ्यांना दहीहंडी फोडण्याची संधी देण्यात आली.
     दहीहंडी कार्यक्रमाची सुरुवात प्रशालेचे प्राचार्य श्री.उदय महिंद्रकर यांनी प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून केली. प्रसंगी पर्यवेक्षक श्री.विजय रसाळ, श्री.श्रीनिवास गजेंद्रगडकर, पर्यवेक्षिका श्रीमती क्षमा देशपांडे, शिक्षकेतर प्रतिनिधी श्रीमती संजीवनी आंबेकर, वरिष्ठ लिपिक श्री.कुंडलिक आंबेकर, कला शिक्षक श्री.चंद्रकांत जोशी उपस्थित होते.
     कार्यक्रमाचे नियोजन संस्कृती विभाग प्रमुख श्री.धनंजय काळे आणि श्री.योगेश कोठावदे यांनी केले. श्री.वैभव सूर्यवंशी, श्री.संजय पालवे, श्रीमती वैशाली ढाकणे, श्री.भीमराव राऊत,श्री.विक्रम शिंदे, श्रीमती शुभांगी कडू, श्रीमती वैजयंती जगताप, श्री.पी.बी.राहिंज, श्री.संकेत कवडे, श्री.रवींद्र माळी, श्री.श्रीकांत म्हसकर यांचे सहकार्य मिळाले.
     दहीहंडीसाठी सामग्री जमा करणे आणि दहीहंडी सजवण्याचे कार्य श्रीमती आशा गवळी, श्री.रामदास भोसले, श्री.सिताराम घारे, श्री.मुकुंद जगताप श्री.प्रकाश आढाव, श्री.गजानन कदम आणि श्री.सचिन गवळी यांनी केले.
       कार्यक्रमासाठी नियामक मंडळ अध्यक्षा डॉ.मृणालिनी गरवारे, कार्यवाह डॉ. सतीश गवळी, सहकार्यवाह श्री.विजयजी भुरके आणि शाळा समिती अध्यक्ष श्री.भगवानभाऊ आंबेकर यांनी शुभेच्छा दिल्या.    https://youtu.be/-2tA3GATlDE?si=Beho35C9YyPmbTsg

Popular posts from this blog

व्ही.पी.एस मध्ये ८०वा स्वातंत्र दिन साजरा

व्ही.पी.एस मध्ये दीप अमावस्या साजरी

विद्यार्थ्यांनी घेतला अध्यापनाचा अनुभव