व्ही.पी.एस मध्ये रक्षाबंधन उत्साहात साजरा....
लोणावळा, संपादक:संजय पालवे विद्या प्रसारिणी सभेच्या व्ही.पी.एस हायस्कूल व द.पू.मेहता कनिष्ठ महाविद्यालयामध्ये रक्षाबंधन उत्साहात साजरा करण्यात आला.
प्रशालेमध्ये नेहमीच विविध सांस्कृतिक उत्सव मोठ्या आनंदाने साजरी केले जातात. याप्रमाणे यंदा रक्षाबंधन वर्गा-वर्गामध्ये विद्यार्थ्यांना राख्या बांधून मोठ्या उत्साह साजरा करण्यात आला.
रक्षाबंधनानिमित्त विद्यार्थिनींनी पारंपारिक गाणे सादर केले. विशेष करून इयत्ता नववी (ब) व पाचवी(अ) वर्गामध्ये विद्यार्थ्यांनी पारंपरिक गाणे आणि राखी विषयी विचार व्यक्त केले. वर्गशिक्षक श्री.दत्तात्रय सुरवसे आणि श्रीमती वैशाली ढाकणे यांनी विद्यार्थ्यांना राखीचे महत्त्व सांगितले.
स्काऊट आणि गाईड विद्यार्थिनींनी तसेच महिला शिक्षिकांनी प्रशालेतील शिक्षकांना राख्या बांधून रक्षाबंधन साजरा केला. कार्यक्रमाचे नियोजन सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री.धनंजय काळे यांनी केले. शालासमिती अध्यक्ष श्री.भगवानभाऊ आंबेकर, प्राचार्य श्री.उदय महिंद्रकर, पर्यवेक्षक श्री.विजय रसाळ, श्री.श्रीनिवास गजेंद्रगडकर पर्यवेक्षिका श्रीमती क्षमा देशपांडे यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
