गुप्ता विद्यालयात दहीहंडी उत्सव साजरा

मळवली, संपादक:संजय पालवे 
   दरवर्षीप्रमाणे यावर्षीही आपल्या विद्यालयात दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. सर्व विद्यार्थ्यांनी आनंदाने सहभाग नोंदवला.    
प्रशालेचे प्राचार्य श्री संतोष पवार व पर्यवेक्षक श्री मकरंद गुर्जर यांच्या नियोजनानुसार सांस्कृतिक समितीने दहीहंडीचे आयोजन केले. कलाशिक्षक धुळाजी देवकाते व विजय कवडे यांनी फलक लेखन व दहीहंडी सुशोभन केले. पर्यवेक्षक श्री मकरंद गुर्जर यांनी सामूहिक श्रीकृष्णाष्टकम् चे पठण केले. 
प्रत्येक वर्गातील मुलांच्या व मुलींच्या गोविंदा पथकांनी मानवी थर रचून दहीहंडीला सलामी दिली.
      इयत्ता दहावीच्या व कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना दहीहंडी फोडण्याचा बहुमान देण्यात आला. सर्व विद्यार्थ्यांनी एक एक वाटी पोहे, लाह्या, मुरमुरे इत्यादी साहित्य जमा केले. श्रीमती कविता गायकवाड, श्रीमती मनीषा जगताप व इतर सहकाऱ्यांनी मिळून गोपाळकाला तयार केला.        प्राचार्य श्री संतोष पवार यांच्या हस्ते भगवान श्रीकृष्णाच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. शिक्षक प्रतिनिधी श्री गणेश गायकवाड व शिक्षकेतर प्रतिनिधी श्री जयराम उंबरे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर उपस्थित होते. सर्व शिक्षक व शिक्षकेतर सेवक यांच्या सहकार्याने कार्यक्रम यशस्वी झाला. https://youtu.be/GqZzO8MPW7Y?si=I4z1jGPEssxDmo84

Popular posts from this blog

व्ही.पी.एस मध्ये ८०वा स्वातंत्र दिन साजरा

व्ही.पी.एस मध्ये दीप अमावस्या साजरी

विद्यार्थ्यांनी घेतला अध्यापनाचा अनुभव