लाडकी बहीण योजनेचे काय होणार परिणाम
लोणावळा, संपादक : संजय पालवे
महाराष्ट्रामध्ये सध्या लाडकी बहिण योजनेचे वारे चांगलेच घुमत आहे. प्रत्येक महिलेला ही योजना घ्यायची आहे परंतु याचा परिणाम काय होणार आहे याची कल्पना कोणालाच नाही.
लाडकी बहिण योजना चांगली की वाईट हे पाहण्यापेक्षा सध्या लोक लाडक्या बहिणीसाठी फॉर्म भरण्यामध्ये गुंतून गेले आहे. शासन अशा योजना लागू करून काय साध्य करू इच्छित आहे? हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारणे गरजेचे आहे.
अशा योजनेने महाराष्ट्र दिवाळखोरीत जाईल का? हे ही पाहणे गरजेचे आहे. यानंतर सरकार कोणाचे येईल कुणालाच माहीत नाही, परंतु भविष्यात या योजना अशाच चालू राहू शकतात का? आणि जर चालू ठेवायचे असेल तर त्यासाठी काय तरतूद करावी लागेल याची कल्पना करणे जरा कठीणच आहे.
एकंदरीत आत्ताचे वातावरण पाहिले तर सर्वच लाडक्या बहिणी खूपच अनंदात आहेत, कारण प्रत्येकीच्या बँक खात्यामध्ये 3000/- ते 4500/- रुपये पर्यंत रक्कम जमा झालेली आहे.
परंतु सध्या तरी ही योजना सफल झाली असे म्हणावे लागेल......
जय महाराष्ट्र.....