भाजे येथील शाळेमध्ये मातृदिन उत्साहात साजरा


मळवली, संपादक: संजय पालवे   
    श्रावणी अमावस्या ही पिठोरी अमावस्या अर्थात मातृदिन भारतीय संस्कृतीच्या परंपरेनुसार माता-पिता हे सर्वांचे प्रथम गुरु असतात. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये मातृ देवो, पितृ देवो भव सांगितले आहे. त्यांचे विषयी आदर व कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. 
    विद्या प्रसारिणी सभेच्या श्रीमती शांतीदेवी गोपीचंद गुप्ता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय व श्री विद्या बालक मंदिर, भाजे-मळवली या दोन्ही शाळांच्या संयुक्त विद्यमाने अतिशय हृद्य व भावस्पर्शी असा मातृदिन कार्यक्रम संपन्न झाला. 
     संस्थेच्या नियामक मंडळाच्या अध्यक्षा डॉ. मृणालिनी गरवारे मॅडम, संस्थेचे कार्यवाह डॉ. सतीश गवळी व सहकार्यवाह श्री विजय भुरके यांच्या प्रेरणेने मातृदिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. इ. 8वी,9 वी व 10 वी च्या विद्यार्थ्यांनी वाद्यवृंदासह सुंदर ईशस्तवन व स्वागतगीत सादर केले. काही विद्यार्थ्यांनी गीत गायन व मनोगते सादर केली. 
     बालक मंदिर च्या छोट्या विद्यार्थ्यांनी आईची महती सांगितली तसेच नृत्याविष्कार सादर करीत आई विषयी कृतज्ञता व्यक्त केली. मागील वर्षीच्या वार्षिक परीक्षेत प्रथम तीन विद्यार्थ्यांच्या पालकांचे औक्षण पाल्यांच्या हस्ते करण्यात आले. औक्षण सुरू असताना पर्यवेक्षक श्री.मकरंद गुर्जर यांनी विद्यार्थी विद्यार्थिनींसह सामूहिक श्रीसूक्तम्, नारायण उपनिषद व नित्य पावन स्मरण या संस्कृत स्तोत्रांचे पठण केले. 
    याप्रसंगी गुणवंत विद्यार्थ्यांच्या पालकांचा शाळेतर्फे तुळस रोप व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. प्रशालेचे प्राचार्य श्री संतोष पवार, पालक मंदिर च्या मुख्याध्यापिका स्वाती रगडे, पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष अमोल तिकोणे  यांच्या हस्ते सरस्वती पूजन करण्यात आले. मातृदिनाच्या प्रसंगी पर्यवेक्षक मकरंद गुर्जर यांनी आपल्या मनोगतातून सद्यस्थितीत शाळेतील मुलींच्या सुरक्षिततेविषयी शाळा व पालक दोघांनी जागरूक राहून विद्यार्थ्यांना सुरक्षित वातावरण द्यावे व यासाठी शाळेने हाती घेतलेले उपक्रम विशद केले.
     मातृदिनाचा कार्यक्रम प्रशालेचे प्राचार्य श्री संतोष पवार, बालक मंदिर च्या मुख्याध्यापिका सौ स्वाती रगडे व पर्यवेक्षक श्री मकरंद गुर्जर यांच्या मार्गदर्शनाखाली सांस्कृतिक समितीने नियोजनबद्ध पद्धतीने साजरा केला. सांस्कृतिक समिती प्रमुख बाळासाहेब कोकणे व सौ कविता गायकवाड, सौ सरस्वती बैले, सौ ललिता पवार, सौ मनीषा जगताप, श्री बाळू शिरसाट, बालक मंदिर च्या शिक्षिका काजल रणदिवे, सुषमा येवले, अनुजा वाघमारे, सीमा सिंह व इतर शिक्षक व शिक्षकेतर यांनी विशेष परिश्रम घेतले. कला शिक्षक श्री धुळाजी देवकाते व विजय कवडे यांनी फलक लेखन व सुशोधन केले. 
   पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष श्री.अमोल तिकोणे, बालक मंदिरच्या शिक्षक प्रतिनिधी शिल्पा आंबेकर, श्री गणेश गायकवाड व शिक्षकेतर प्रतिनिधी जयराम उंबरे व दोन्ही शाळांचे पालक व गुणवंत विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर सेवक यांच्या सहकार्यामुळे कार्यक्रम यशस्वी झाला. शिक्षक प्रतिनिधी श्री गणेश गायकवाड यांनी आभार प्रदर्शन केले. कु. अश्विनी अत्तरदे व धनंजय आंबेकर या दहावीच्या विद्यार्थ्यांनी सुंदर सूत्रसंचालन केले. मातृदिनाच्या या मंगलदिनी आमच्या विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना आपआपल्या घरातील सर्व ज्येष्ठ व्यक्तींचे (आई वडील, आजी आजोबा, मामा मामी, आत्या, चुलते इत्यादी) औक्षण व पूजन करून त्यांना नमस्कार करण्याचे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला विद्यार्थ्यांनी खुप छान प्रतिसाद दिला.
     सर्व मोठ्या व्यक्तींचा सन्मान राखणं हा एक मोठा संस्कार मातृदिनाच्या निमित्ताने रुजवण्याचा एक अल्पसा प्रयत्न शाळेतर्फे करण्यात आला. अतिशय सुंदर असा मातृदिन सर्व विद्यार्थ्यांनी आपापल्या घरी देखील साजरा केला.

Popular posts from this blog

व्ही.पी.एस मध्ये ८०वा स्वातंत्र दिन साजरा

व्ही.पी.एस मध्ये दीप अमावस्या साजरी

विद्यार्थ्यांनी घेतला अध्यापनाचा अनुभव