विद्यार्थी सुरक्षा निमित्त दिपाली पाटील यांनी साधला पालकांशी संवाद...
लोणावळा, संपादक: संजय पालवे
विद्या प्रसारिणी सभेच्या व्ही.पी.एस.प्राथमिक विद्यालय लोणावळा शाळेत शालेय विद्यार्थी विद्यार्थिनींच्या सुरक्षा विषय उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यासंदर्भात विद्यार्थी सुरक्षा या विषयावरती पालक सभेचे आयोजन करण्यात आले होते. पालक सभेच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ मंगल जाधव मॅडम उपस्थित होत्या. पालक सभेचे प्रास्ताविक सौ. मंगल जाधव मॅडम यांनी केले.सदर सभेस मार्गदर्शन करण्यासाठी लोणावळा शहर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. सुहास जगताप साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दिपाली पाटील मॅडम यांनी पालकांना समुपदेशन केले.
समाजामध्ये घडणाऱ्या विविध घटना आणि त्याचे परिणाम याची माहिती पालकांना देण्यात आली. विद्यार्थ्यांची काळजी कशाप्रकारे घ्यावी याची माहिती पाटील मॅडम यांनी पालकांना समजून सांगितली. शाळेत सीसीटिव्ही, तक्रार पेटी,विद्यार्थी सुरक्षा समिती असावी अशा सूचना मॅडमनी केल्या. विद्यार्थी हसत खेळत शाळेत कशाप्रकारे आला पाहिजे याचे उत्तम उदाहरण पाटील मॅडम यांनी पालकांना समजून सांगितले. शेवटी पालकांना बोलते करून पालकांच्या अडचणी समजून घेण्यात आल्या. पालकांनी आपले मत व्यक्त केले.
पालक सभा संस्थेच्या अध्यक्षा डॉ .मृणालीनी गरवारे मॅडम ,संस्थेचे कार्यवाह डॉ. सतीश गवळी सर, संस्थेचे सहकार्यवाह श्री. विजय भुरके सर यांच्या सूचनेनुसार आयोजित करण्यात आली होती. यावेळी व्ही.पी.एस हायस्कूलचे प्राचार्य श्री. उदय महेंद्रकर उपस्थित होते. शिक्षक श्री.हनुमंत शिंदे, शिक्षिका सौ मनीषा जरग, सौ.सुनीता वरे पालक सभेस उपस्थित होते.
पालक सभेचे सूत्रसंचलन श्री.प्रकाश पाटील यांनी केले तर आभार श्री संजय भालचिम यांनी मानले.