'मराठी विषय' तालुका अध्यक्षपदी निवड
लोणावळा, संपादक : संजय पालवे
महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यायीन मराठी विषय महासंघ राज्यस्तरीय कार्यकारणी समिती च्या आदेशानुसार प्राध्यापक श्री.सचिन लांडगे यांची पुणे जिल्हा कनिष्ठ महाविद्यालय मराठी विषय शिक्षक महासंघ कार्यकारणी आणि तालुका अध्यक्षपदी नियुक्ती जाहीर झाली.
महासंघ राज्यस्तरीय कार्यकारणी समिती अध्यक्ष प्रा.श्री.सुनील डिसले (बारामती),सचिव श्री.बाळासाहेब माने (मुंबई), कार्याध्यक्ष डॉ. मनीषा रिठे (वर्धा) यांच्या मार्गदर्शनाखाली सदर निवड करण्यात आली
प्रा.सचिन लांडगे सतत पंधरा वर्षापासून लोणावळा येथील व्ही.पी.एस हायस्कूल व द.पू. मेहता कनिष्ठ महाविद्यालयामध्ये अध्यापनाचे कार्य करत आहेत. आपल्या ज्ञानामध्ये त्यांनी नेहमीच भर घातली आहेत. सरांनी एम.ए. मराठी, हिंदी, समाजशास्त्र आणि अर्थशास्त्र विषयांमध्ये पूर्ण केले आहे. सरांचा लोणावळा परिसरातील पालक आणि विद्यार्थ्यांशी चांगला संपर्क आहे. सरांच्या कार्याची दखल घेत, रोटरी क्लब ऑफ लोणावळा यांच्याकडून आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झाला आहे.
प्रा.सचिन लांडगे यांच्या निवडीमुळे नियामक मंडळ अध्यक्ष डॉ. मृणालिनी गरवारे, कार्यवाह डॉ.सतीश गवळी, सहकार्यवाह श्री. विजयजी भुरके, नियामाक मंडळ सदस्य तथा शाळा समिती अध्यक्ष श्री.भगवानभाऊ आंबेकर, प्राचार्य श्री.उदय महिंद्रकर, उपप्राचार्य श्री.आदिनाथ दहिफळे, उपमुख्याध्यापक श्री. सुहास विसाळ, पर्यवेक्षक श्री.विजय रसाळ, श्री.श्रीनिवास गजेंद्रगडकर, पर्यवेक्षिका श्रीमती क्षमा देशपांडे, शिक्षक प्रतिनिधी श्रीमती ज्योती डामसे, शिक्षकेतर प्रतिनिधी श्रीमती संजीवनी आंबेकर आणि ज्येष्ठ लिपिक श्री.कुंडलिक आंबेकर यांनी सरांचे अभिनंदन करत पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.