संत भगवान बाबा आणि संत वामनभाऊ संयुक्त पुण्यतिथीचे आयोजन
तळेगांव दाभाडे, संपादक : संजय पालवे
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी ऐश्वर्यसंपन्न संत भगवान बाबा आणि वैराग्यमूर्ती संत वामनभाऊ महाराज संयुक्त पुण्यतिथी सोहळा मोठया भक्तिभावाने साजरा करण्यात आला.
कार्यक्रम कै.गोळवलकर गुरुजी मैदान यशवंतनगर तळेगांव दाभाडे या ठिकाणी संपन्न झाला. सोहळ्या निमित्त प्रतिमा पूजन, हरिपाठ, पावली, सांप्रदायिक गायण घेण्यात आली. सायंकाळी ७ ते ९ ह.भ.प.गुरुवर्य रामगिरी महाराज (येळेश्वर संस्थान येळी, भगवानगड) यांचे सुश्राव्य हरिकीर्तनाचे आयोजन करण्यात आले.
एम.पी.एस.सी, यु.पी.एस.सी आणि विविध स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक यानिमित्ताने करण्यात आले. शाल, गुच्छ, सन्मान चिन्ह देऊन महाराजांच्या व पाहुण्यांच्या हस्ते मान्यवरांचे सत्कार करण्यात आला.
कार्यक्रम पार पाडण्यासाठी तळेगाव दाभाडे, वाघोली, देहू, आळंदी, पिंपरी, चिंचवड, लोणावळा आणि मावळ परिसरातील भक्तांनी मोलाचे सहकार्य केले. तळेगाव दाभाडे येथील शिक्षक फ्रेंड्स ग्रुप मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
कार्यक्रमाचे आयोजन संत भगवान बाबा विचारमंच मावळ आणि संत भगवान बाबा बचत गट तळेगाव दाभाडे यांच्या वतीने घेण्यात आला असेल तरी सर्वांच्या सहकार्यातून, देणगीमधून परपडला अशी माहिती संत भगवान बाबा विचारमंच अध्यक्ष श्री.अशोक कराड यांनी दिली.