‘गुप्ता’ विद्यालयात मराठी भाषा गौरव दिन साजरा
लोणावळा, संपादक : संजय पालवे
विद्या प्रसारिणी सभेच्या श्रीमती शांतीदेवी गोपीचंद गुप्ता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय भाजे, मळवली मध्ये मराठी भाषा गौरव दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला .
नियमक मंडळाच्या अध्यक्षा मृणालिनी गरवारे, कार्यवाह डॉ.सतीश गवळी, सहकार्यवाह श्री.विजयजी भुरके यांच्या प्रेरणेने मराठी भाषा गौरव दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
प्रशालेचे प्राचार्य श्री.संतोष पवार, पर्यवेक्षक श्री.मकरंद गुर्जर यांच्या नियोजनानुसार कार्यक्रमाचे आयोजन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री.गहिनीनाथ बारगजे यांनी केले आणि कुसुमाग्रजांच्या कार्याचा विद्यार्थ्यांना परिचय करून दिला.
विद्यालयातील विद्यार्थ्यांनी गोष्टी, कथाकथन, कविता वाचन, नृत्याद्वारे मराठी भाषेचे महत्व सांगितले.श्री. मनोहर भोसले यांनी आपल्या मनोगतातून मराठी ही जगातील सर्वात सुंदर भाषा आहे असे सांगितले. प्राचार्य श्री.संतोष पवार यांनी भाषेला संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम ,संत एकनाथ ,संत नामदेव, श्री .चक्रधर स्वामींची परंपरा लाभली आहे असे सांगितले व मराठी भाषा गौरव दिनाच्या शुभेच्छा दिल्या. कलाशिक्षक श्री.धुळाजी देवकाते यांनी उत्कृष्ट फलक लेखन केले .
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मराठी विभाग प्रमुख श्री.रोहिदास डिकोळे सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. नववीतील विद्यार्थीनी वेदिका केदारी व श्रावणी नेवाळे यांनी उत्कृष्ट सूत्रसंचालन केले. श्री.गहिनीनाथ बारगजे यांनी आभार मानले.