व्ही.पी.एस मध्ये जागतिक महिला दिनाचे आयोजन
लोणावळा, संपादक:संजय पालवे
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशालेचे प्राचार्य श्री.उदय महिंद्रकर होते. कार्यक्रमासाठी उपमुख्यद्यापक श्री.सुहास विसाळ, उपप्राचार्य श्री.आदिनाथ दहिफळे, पर्यवेक्षक श्री.विजय रसाळ, श्री. श्रीनिवास गजेंद्रगडकर, शिक्षक प्रतिनिधी श्रीमती ज्योती डामसे आणि शिक्षकेतर प्रतिनिधी श्रीमती संजीवनी आंबेकर उपस्थित होते. 
विद्या प्रसारिणी सभेच्या व्ही.पी.एस हायस्कूल व द.पू.मेहता कनिष्ठ महाविद्यालया मध्ये जागतिक महिला दिनाचे आयोजन करण्यात आले.
जागतिक महिला दिनानिमित्त प्रशालीतील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. कुमारी श्वेता भदरगे, कुमारी आदिती पवार, चिरंजीव विराज गड्डे आणि कुमारी जानवी मुळे विद्यार्थ्यांनी कविता आणि भाषणे सादर केले. प्रशालेच्या ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती वैजयंती जगताप स्व: लिखित ‘स्त्री शक्तीचा जागर’ पथनाट्याचे सादरीकरण करण्यात आले.
जागतिक महिला दिनानिमित्त प्रशालेतील शिक्षिका आणि शिक्षकेतर महिला कर्मचारी वर्गाचा सन्मान प्रशालेच्या वतीने करण्यात आला. सन्मानाला प्रत्युत्तर ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती शुभांगी कडू यांनी आपल्या मनोगत मधून दिले आणि श्रीमती संजीवनी आंबेकर यांनी देखील आपली मनोगते सादर केली. जेष्ठ शिक्षक श्री.हरीभाऊ कुलकर्णी यांनी हिंदी कविता सादर केली.
अध्यक्षीय मनोगता मधून प्राचार्य श्री. उदय महिंद्रकर यांनी स्त्रियांच्या कार्याचे वर्णन करत स्त्रीयांचे समाजातील महत्त्व विशद केले.
जागतिक महिला दिनानिमित्त विद्या प्रसारिणी सभेच्या नियामक मंडळाच्या अध्यक्षा डॉ.मृणालिनी गरवारे, कार्यवाह डॉ.सतीश गवळी, सहकार्यवाह श्री.विजयजी भुरके आणि नियामक मंडळ सदस्य तथा शाळा समिती अध्यक्ष श्री. भगवानभाऊ आंबेकर यांनी प्रशालेतील महिलांना शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे नियोजन सांस्कृतिक समिती प्रमुख श्री.धनंजय काळे, श्री. योगेश कोठावदे आणि समिती सदस्यांनी केले. सूत्रसंचालन श्री.सोमनाथ ढुमणे, प्रस्ताविक श्रीमती ज्योती डामसे तर आभार श्री.संजय पालवे यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.