व्ही.पी.एस हायस्कूल मध्ये महात्मा फुले जयंती साजरी
लोणावळा, संपादक:संजय पालवे
महात्मा जोतिराव फुले हे ‘ महात्मा फुले ’ या नावाने लोकप्रिय आहे. महाराष्ट्रातील महत्त्वाच्या समाजसुधारकांमध्ये त्यांचे नाव गणले जाते. एवढ्यावरच त्यांची ओळख थांबलेली नसून एक विचारवंत, जातीविरोधी समाजसुधारक आणि उच्च प्रतीचे लेखक होते.
विद्या प्रसारिणी सभेच्या व्ही.पी.एस हायस्कूल व द.पू.मेहता कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये महात्मा जोतिराव फुले जयंती साजरी करण्यात आली.
महात्मा जोतिराव फुले हे ‘ महात्मा फुले ’ या नावाने लोकप्रिय आहे. महाराष्ट्रातील महत्त्वाच्या समाजसुधारकांमध्ये त्यांचे नाव गणले जाते. एवढ्यावरच त्यांची ओळख थांबलेली नसून एक विचारवंत, जातीविरोधी समाजसुधारक आणि उच्च प्रतीचे लेखक होते.
त्याचबरोबर सामाजिक प्रबोधन, अस्पृश्यता, जाती व्यवस्थे चे निर्मूलन आणि स्त्रियांना आणि मागास जातीमधील लोकांना शिक्षणाची संधी मिळावी म्हणून समाजाचा विरोध पत्करून त्यांनी आपले कार्य केले.
सामाजिक कार्य करत असताना त्यांनी आपल्या पत्नी सावित्रीबाई फुले यांना सोबत घेतले. त्यांना प्रथम शिक्षित केले आणि नंतर स्त्री शिक्षणाची सर्वस्वी जबाबदारी त्यांनी त्यांच्यावर सोपवली.
‘शेतकऱ्यांचा आसूड’ हा महात्मा फुले यांचा प्रसिद्ध ग्रंथ आहे. तत्कालीन समाजामध्ये जातिभेद, अनिष्ट प्रथा, उच्चवर्णी यांची मक्तेदारी यांच्या विरोधाची प्रतिक्रिया त्यांच्या साहित्यातून उमटलेली आहे.
महात्मा जोतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. प्रसंगी शाला समिती सदस्य श्री.धीरूभाई कल्याणजी, प्राचार्य श्री.उदय महिंद्रकर, उपमुख्याध्यापक श्री.सुहास विसाळ, ज्येष्ठ पर्यवेक्षक श्री.विजय रसाळ, श्री.श्रीनिवास गजेंद्रगडकर, शिक्षकेतर प्रतिनिधी श्रीमती संजीवनी आंबेकर, वरिष्ठ लिपिक श्री. कुंडलिक आंबेकर, सांस्कृतिक समिती प्रमुख श्री.धनंजय काळे आणि श्री.योगेश कोठावदे, शिक्षक–शिक्षिका तसेच शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
महात्मा फुले जयंतीनिमित्त नियामक मंडळ अध्यक्षा डॉ.मृणालिनी गरवारे, कार्यवाह डॉ.सतीश गवळी, सहकार्यवाह श्री.विजय भुरके, नियामक मंडळ सदस्य तथा शाला समिती अध्यक्ष श्री.भगवानभाऊ आंबेकर यांनी शुभेच्छा दिल्या.