प्राचार्य श्री उदय महिंद्रकर सेवापूर्ती समारंभ संपन्न

लोणावळा, संपादक:संजय पालवे 
      विद्या प्रसारिणी सभेच्या व्ही.पी.एस हायस्कूल व द.पू.मेहता कनिष्ठ महाविद्यालयातील प्रकाश हॉल मध्ये प्राचार्य श्री.उदय प्रभाकर महिंद्रकर सरांचा सेवापूर्ती समारंभ दिमाखदार पद्धतीने साजरा करण्यात आला.    
   कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्या प्रसारिणी सभेचे कार्यवाह डॉ.सतीश गवळी होते. कार्यक्रमासाठी सहकार्यवाह श्री.विजयजी भुरके, नियामक मंडळ सदस्य तथा शाळा समिती अध्यक्ष श्री. भगवानभाऊ आंबेकर, श्रीमती छाया महिंद्रकर (उपशिक्षणाधिकारी जि.प. पुणे), शाळा समिती सदस्य श्री.राजेशजी मेहता, श्री.धीरूभाई कल्याणजी, श्री.गिरीश पारख, मा.सरपंच श्री.राजू खांडेभरड उपस्थित होते.
     कार्यक्रमासाठी मंचावर उपप्राचार्य श्री. आदिनाथ दहिफळे, उपमुख्याध्यापक श्री. सुहास विसाळ, पर्यवेक्षक श्री.विजय रसाळ, श्री.श्रीनिवास गजेंद्रगडकर, मुख्य लिपिक श्री.कुंडलिक आंबेकर, शिक्षक प्रतिनिधी श्रीमती ज्योती डामसे, शिक्षकेतर प्रतिनिधी श्रीमती संजीवनी आंबेकर, प्राचार्य श्री.संतोष पवार, श्रीमती हवालदार, माजी प्राचार्य श्री.संजीव रत्नपारखी, श्रीमती गानू, श्री.रामदास दरेकर श्री.सुधींद्र देशपांडे, श्रीमती उज्वला पिंगळे उपस्थित होते.
     कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन आणि श्री.धनंजय काळे यांच्या स्वागत गीताने झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपमुख्याध्यापक श्री.सुहास विसाळ यांनी केले. त्यांनी आपल्या प्रास्ताविकामधून सत्कारमूर्तीचा जीवनपट मांडण्याचा प्रयत्न केला.
     व्ही.पी.एस च्या परंपरेप्रमाणे मान्यवरांना स्काऊट शिक्षक श्री.संजय पालवे यांच्या मार्गदर्शनाखाली स्काऊट आणि गाईड बँड पथकाद्वारे मानवंदना देण्यात आली. उपस्थित मान्यवरांचा यथोचित सत्कार समारंभ पार पडल्यानंतर सत्कारमूर्ती श्री.उदय महिंद्रकर आणि त्यांच्या सुविद्य पत्नी  श्रीमती छाया महिंद्रकर यांना प्रशाले तर्फे सन्मानित करून सुंदर भेटवस्तू प्रदान करण्यात आली.
     कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.सतीश गवळी, शाळा समिती अध्यक्ष श्री.भगवानभाऊ आंबेकर, श्रीमती छाया महिंद्रकर, श्री. विजय रसाळ, श्री.विठ्ठल खेडकर, श्री.कल्याण चौगुले, श्री.हरिभाऊ कुलकर्णी, माजी प्राचार्य श्री.रामदास दरेकर, श्री.सुधींद देशपांडे, श्रीमती ज्योती डामसे यांनी आपली मनोगते व्यक्त केली. 
       सत्काराला उत्तर देतांना प्राचार्य श्री. महिंद्रकर सरांनी विद्या प्रसारिणी सभेचे आभार मानले. त्याचबरोबर कै.डॉ. गोवर्धन शिंगरे (बाबा) यांचे विशेष आभार मानले.
    कार्यक्रमाचे अप्रतिम नियोजन संस्कृती विभाग प्रमुख श्री.धनंजय काळे आणि श्री. योगेश कोठावदे यांनी केले. त्याचबरोबर त्यांना समितीमधील शिक्षक आणि सेवक यांनी देखील मोलाचे सहकार्य केले. स्टेजवरील मान्यवरांच्या सत्काराची जबाबदारी श्रीमती मनीषा खेडकर आणि श्रीमती वैशाली ढाकणे यांनी पार पाडली. 
     कार्यक्रमासाठी भारत इंग्लिश स्कूल पुणे, शेठ हिरालाल प्रशाला पुणे, श्रीमती शांतीदेवी गोपीचंद गुप्ता विद्यालय मळवली (भाजे) ठिकाणावरून विभाग प्रमुख आणि शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
     कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.सोमनाथ  ढुमणे यांनी आपल्या बहारदार शैलीने केले, तर उपस्थित मान्यवरांचे आभार पर्यवेक्षक श्री.गजेंद्रगडकर यांनी मांडले.
https://youtu.be/n7t2GU-6iwY?si=BXCsTeBIc6VxXBBb

Popular posts from this blog

व्ही.पी.एस. हायस्कूलमध्ये पारंपरिक महाभोंडल्याचा उत्साहात जल्लोष

व्ही.पी.एस मध्ये दीप अमावस्या साजरी

व्ही.पी.एस मध्ये ८०वा स्वातंत्र दिन साजरा