व्ही.पी.एस मध्ये महाराष्ट्र दिन साजरा
लोणावळा, संपादक:संजय पालवे
विद्या प्रसारिणी सभेच्या व्ही.पी.एस हायस्कूल व द.पू. मेहता कनिष्ठ महाविद्यालयामध्ये महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन उत्साहाने साजरा करण्यात आला.
कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती नियामक मंडळ सदस्य तथा शाळा समिती अध्यक्ष श्री.भगवानभाऊ आंबेकर होते. त्याचबरोबर शाळा समिती सदस्य श्री. धीरूभाई कल्याणजी, श्री.राजेशजी मेहता, मा.प्राचार्य श्री. उदय महिंद्रकर, उपमुख्याध्यापक श्री. सुहास विसाळ, उपप्राचार्य श्री.आदिनाथ दहिफळे, बी.सी.एस विभागाचे प्राचार्य चंद्रकांत भगत, पर्यवेक्षक श्री.श्रीनिवास गजेंद्रगडकर, शिक्षक प्रतिनिधी श्रीमती ज्योती डामसे, शिक्षकेतर प्रतिनिधी श्रीमती संजीवनी आंबेकर, वरिष्ठ लिपिक श्री.कुंडलिक आंबेकर, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका श्रीमती मंगल जाधव, श्रीमती सविता सिंग मॉन्टेसरी विभाग प्रमुख श्रीमती सूर्यवंशी मॅडम उपस्थित होते.
विद्या प्रसारिणी सभेच्या परंपरेनुसार यावर्षीच्या ध्वजारोहणाचा मान शासकीय नियमानुसार सेवानिवृत्त होत असलेल्या प्रशालेच्या ग्रंथपाल श्रीमती संजीवनी आंबेकर यांना प्रदान करण्यात आला.
उपस्थितांपैकी शालसमिती अध्यक्ष श्री.भगवानभाऊ आंबेकर, श्रीमती संजीवनी आंबेकर आणि मा.प्राचार्य उदय महिंद्रकर यांनी महाराष्ट्र दिन आणि कामगार दिना निमित्त उपस्थित विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी
यांना शुभेच्छा देत शुभ संदेश दिला.
महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत दरवर्षीप्रमाणे याही वर्षी कॉलेज विभागाच्या प्राध्यापिका श्रीमती संगीता कोल्हे यांनी ग्रंथालयासाठी काही पुस्तके भेट स्वरूपात दिली. शाळा समिती अध्यक्ष, प्राचार्य आणि ग्रंथालय प्रमुखांनी याचा स्वीकार केला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि प्रास्ताविक श्रीमती वैशाली तारु आणि श्रीमती रेवती बोके यांनी केले. श्री.भीमराव राऊत आणि श्री.ज्ञानेश्वर बुरांडे, श्रीमती सुनिता बनकर, श्रीमती स्वाती व्हरांबळे यांनी सहकार्य केले. फलक लेखन श्री.महेश चोणगे तर राष्ट्रगीत, राज्यगीत आणि ध्वजगीताचे गायन श्री.धनंजय काळे यांनी केले.
महाराष्ट्र दिन आणि कामगार दिना निमित्त विद्या प्रसारिणी सभेच्या नियामक मंडळ अध्यक्षा डॉ.मृणालिनी गरवारे, कार्यवाह डॉ.सतीश गवळी आणि सहकार्यवाह श्री.विजयजी भुरके यांनी व्ही.पी.एस मधील सर्व कर्मचाऱ्यांना शुभेच्छा दिल्या.