व्ही.पी.एस हायस्कूल व द.पू.मेहता कनिष्ठ महाविद्यालयाचे घवघवीत यश
लोणावळा, संपादक:संजय पालवे
विद्या प्रसारिणी सभेच्या व्ही.पी.एस हायस्कूल व द.पू.मेहता कनिष्ठ महाविद्यालयाने बारावीच्या परीक्षेत घवघवीत यश मिळवले.
कनिष्ठ महाविद्यालयामध्ये विज्ञान आणि वाणिज्य अशा शाखा चालवल्या जातात. विज्ञान शाखेचे 314 विद्यार्थी परीक्षेसाठी बसले होते. त्यापैकी 309 विद्यार्थी पास झाले असून 98.41% निकाल लागला. वाणिज्य शाखेतील 587 विद्यार्थी परीक्षेसाठी बसले होते त्यापैकी 569 विद्यार्थी पास झाले असून 97.45 % निकाल लागला. दोनही शाखेतील 901 विद्यार्थ्यांपैकी 878 विद्यार्थी पास झाले असून 97.45% निकाल लागला.
पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात ग्रामीण भागात सर्वात जास्त विद्यार्थी असून देखील महाविद्यालयाने घवघवीत यश मिळवले त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
विज्ञान शाखेतील कु.अबोली बोडके (93.83%), कु.समृद्धी पाळेकर (89.67%), कु.पूर्वा धामणस्कर (84.33%), चि.अर्णव कालगुडे(79.83%) कु.आर्या आंबेकर(79.50%) विद्यार्थीनींनी क्रमांक पटकावले. तसेच वाणिज्य शाखेतील कु.मेवेश शेख (93.62%), कु.पूजा पांडे (92.50%), चि.ओम कदम (90.83%), कु.नेहा कामठी(88%), कु.पूनम भानुसघरे(87.67%) निद्यार्थांनी यश मिळवले. कु.मेवेश शेख आणि कु.पूजा पांडे या विद्यार्थीनींनी बुक कीपिंग विषयामध्ये शंभर गुण प्राप्त केले.
विद्यालयामध्ये विद्यार्थ्यांना निकालाचे वाटप नियामक मंडळ सदस्य तथा शाळा समिती अध्यक्ष श्री.भगवानभाऊ आंबेकर, शाळा समिती सदस्य श्री.धीरूभाई कल्याणजी, श्री.राजेशजी मेहता, प्राचार्य श्री.सुहास विसाळ, श्री.विजय रसाळ(ज्येष्ठ पर्यवेक्षक), उपप्राचार्य श्री.आदिनाथ दहिफळे, वरिष्ठ लिपिक श्री.कुंडलिक आंबेकर आणि श्री.राजू खांडेभरड यांच्या हस्ते करण्यात आले. प्रसंगी शिक्षकेतर प्रमुख श्रीमती संजीवनी आंबेकर, श्री.कल्याण चौगुले, श्री.बाळू पिंगट, श्री.सुनील बागल, श्रीमती वंदना कोळेकर, श्री.वीरेंद्र धुमाळ, श्रीमती स्वाती पाटील, श्रीमती भूमिका सिंगासने, श्रीमती सविता सिंह, श्री.सचिन थोरात, श्री.निलेश ढाकोळ उपस्थित होते.
व्ही.पी.एस हायस्कूल व द.पू.मेहता कनिष्ठ महाविद्यालयाला पालक आणि विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर पसंती देतात कारण अध्यापन करणारे शिक्षक अतिशय उच्च शिक्षित आणि अनुभवी आहेत. तसेच मोठे ग्रंथालयं, स्वतंत्र प्रयोग शाळा, सुसज्ज संगणक विभाग, मोठे क्रीडांगण आणि आनंदायी वातावरण.
विद्यार्थांनी मिळवलेल्या यशा बद्दल नियामक मंडळ अध्यक्षा डॉ.मृणालिनी गरवारे, कार्यवाह डॉ.सतीश गवळी सहकार्यवाह श्री.विजयजी भुरके आणि शालासमिती अध्यक्ष श्री.भगवानभाऊ आंबेकर यांनी विद्यार्थी आणि त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे अभिनंदन आणि कौतुक केले.