आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा
लोणावळा, संपादक संजय पालवे
विद्या प्रसारणी सभेच्या व्ही.पी.एस हायस्कूल व द.पू. मेहता कनिष्ठ महाविद्यालयामध्ये 21 जून आंतरराष्ट्रीय योग दिन सकाळ व दुपार दोन सत्रांमध्ये आयोजित करण्यात आला.
आंतरराष्ट्रीय योग दिनामध्ये नववी आणि बारावी मधील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. प्रात्यक्षिकाचे सादरीकरण कु. अनुजा केदारे, कु.संजना राक्षे, कु.रिदीमा सावंत यांनी केले.
कार्यक्रमाचे नियोजन आणि प्रस्तावना क्रीडा प्रमुख श्रीमती वैशाली तारु यांनी केली. योगाचे महत्त्व श्री.ज्ञानेश्वर बुरांडे, श्रीमती रेवती बोके, यांनी विद्यार्थ्यांना सांगितले. तसेच कार्यक्रमासाठी श्री.मयूर विटे, श्री. शितलकुमार सुतार, श्री.सुनील बागल आणि श्री.कल्याण चौगुले यांनी सहकार्य केले.
योग दिनाप्रसंगी प्रशालेतील व कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांनी सहभाग घेतला. प्रात्यक्षिक दाखवणाऱ्या विद्यार्थिनींचे कौतुक प्रशालेचे प्राचार्य सुहास विसाळ, उपमुख्याध्यापक श्री. विजय रसाळ, उपप्राचार्य श्री.आदिनाथ दहिफळे, पर्यवेक्षक श्री.श्रीनिवास गजेंद्रगडकर, पर्यवेक्षिका श्रीमती अक्षता पाध्ये, श्री.अनिल खामकर, शिक्षक प्रतिनिधी श्रीमती स्नेहलता कांबळे आणि शिक्षकेतर प्रतिनिधी श्री.सचिन थोरात यांनी केले.
आंतरराष्ट्रीय योग दिना निमित्त नियामक मंडळाच्या अध्यक्षा डॉ. मृणालिनी गरवारे, कार्यवाह डॉ.सतीश गवळी, सहकार्यवाह श्री.विजयजी भुरके आणि नियामक मंडळ सदस्य तथा शाळा समिती अध्यक्ष श्री.भगवानभाऊ आंबेकर यांनी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमासाठी उपस्थित पाहुण्यांचा परिचय श्रीमती वैशाली तारू यांनी करून दिला तर आभार श्री.भीमराव राऊत यांनी मानले.