आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन

लोणावळा, संपादक:संजय पालवे 
     विद्या प्रसारिणी सभेच्या व्ही.पी.एस हायस्कूल व द.पू. मेहता कनिष्ठ महाविद्यालय मध्ये आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त विद्यार्थी मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले.
     कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे श्री. राजेश रामागरे (पोलीस निरीक्षक लोणावळा शहर), श्री.राहुल लाड (सहाय्यक पोलीस निरीक्षक), श्री. सूर्यकांत वाणी (पोलीस उपनिरीक्षक), श्री.शेखर कुलकर्णी (पोलीस कॉन्स्टेबल), श्री.स्वप्नील पाटील (पोलीस कॉन्स्टेबल), श्री.स्वप्नील जाधव (पोलीस कॉन्स्टेबल) उपस्थित होते. 
     कार्यक्रमाचे अध्यक्ष कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य श्री.आदिनाथ दहिफळे होते. कार्यक्रमासाठी शिक्षकेतर प्रतिनिधी श्री.सचिन थोरात, ज्येष्ठ लिपिक श्री.निलेश ढाकोळ आणि कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 
     लोणावळा शहर भारतातच नव्हे तर जगभरामध्ये थंड हवेचे ठिकाण आणि पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध आहे. त्यामुळे लोणावळा या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांची संख्या पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये असते. निसर्गप्रेमीं बरोबरच मद्यपान करणाऱ्या पर्यटकांची संख्याही मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे लोणावळा परिसरातील शालेय विद्यार्थ्यांवर याचा विपरीत परिणाम होतांना दिसून येतो. सदर कारणास्तव लोणावळा शहर पोलीस यंत्रणेमार्फत  विद्यार्थी जागृती मोहीम हाती घेण्यात आली. कनिष्ठ महाविद्यालयाच्या इयत्ता बारावी मध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी लोणावळा शहर पोलीस यांच्यातर्फे मार्गदर्शन करण्यात आले. 
      कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती स्वाती पोटफोडे यांनी तर प्रास्ताविक उपप्राचार्य श्री आदिनाथ दहिफळे यांनी केले.

Popular posts from this blog

व्ही.पी.एस. हायस्कूलमध्ये पारंपरिक महाभोंडल्याचा उत्साहात जल्लोष

व्ही.पी.एस मध्ये दीप अमावस्या साजरी

व्ही.पी.एस मध्ये ८०वा स्वातंत्र दिन साजरा