छत्रपती शाहू महाराज आणि महाकवी कालिदास जयंती साजरी

लोणावळा, संपादक : संजय पालवे 
   विद्या प्रसारिणी सभेच्या श्रीमती शांतीदेवी गोपीचंद गुप्ता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात राजर्षी छत्रपती शाहू महाराज आणि महाकवी कालिदास जयंती साजरी करण्यात आली . नियामक मंडळाच्या अध्यक्षा डॉ.मृणालिनी गरवारे, कार्यवाह डॉ.सतीश गवळी आणि सहकार्यवाह श्री.विजयजी भुरके यांच्या प्रेरणेने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. 
     कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य श्री.संतोष पवार होते .याप्रसंगी पर्यवेक्षक श्री . मकरंद गुर्जर, शिक्षक प्रतिनिधी बाळू शिरसाट ,शिक्षकेतर प्रतिनिधी श्री. मुकुंद भोसले आणि क्रीडा शिक्षक श्री. प्रशांत घाडगे उपस्थित होते .
     कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शाहू महाराज ,महाकवी कालिदास आणि सरस्वतीच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलनाने करण्यात आली .प्रशालेतील विद्यार्थ्यांनी छत्रपती शाहू महाराजांच्या कार्याविषयी माहिती सांगितली .त्यामध्ये कु. यशस्वी शेलार, कु. संचिता तिकोणे , कु .दूर्वा शेलार, कु.स्वरा जायगुडे, कु .श्रावणी वाघमारे, कु.तन्वी शेलार, कु.अनन्या तिकोणे, कु .अलिशा विखार, कु .रिद्धी जगताप, कु.प्रीती भोसले, कु.माया पारधे, कु.आदिती पडवळ, कु.केदारी संजीवनी, कु .श्रेया तिकोणे, कु.पुनम उबाळे , कु.पायल देसाई , कु .सायली पवार, कु. श्रद्धा काटकर, चि .वेदांत शिवेकर , कु.श्रावणी नेवाळे यांचा समावेश होता. इयत्ता सहावी मधील चि.आश्विक साबळे  विद्यार्थी शाहू महाराजांची वेशभूषा परिधान करून कार्यक्रमात सहभागी होता. कु.समृद्धी कऱ्हे विद्यार्थिनीने महाकवी कालिदासांविषयी गोष्टी रुपात विद्यार्थ्यांना माहिती सांगितली .
    प्रमुख मनोगतांमध्ये प्रशालेतील ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती अश्विनी दुर्गुडे यांनी छत्रपती शाहू महाराजांविषयी विद्यार्थ्यांना माहिती सांगितली .प्रशालेतील ज्येष्ठ संस्कृत शिक्षक श्री. गहिनीनाथ बारगजे यांनी महाकवी कालिदास यांच्या साहित्याची ओळख विद्यार्थ्यांना गोष्टी रुपात करून दिली .
    कार्यक्रमाचे नियोजन सांस्कृतिक विभाग प्रमुख श्रीमती कविता गायकवाड, श्रीमती ललिता पवार तसेच समितीतील सर्व सदस्यांनी केले. श्री.विजय कवडे यांनी उत्कृष्ट फलक लेखन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक श्री. गहिनीनाथ बारगजे यांनी केले तर आभार शिक्षक प्रतिनिधी बाळू शिरसाट यांनी  मानले .या कार्यक्रमाचे चित्रीकरण प्रसिद्धी समिती प्रमुख श्री.जालिंदर बनकर यांनी केले .कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व शिक्षक शिक्षिका सेवक यांनी मोलाचे सहकार्य केले .

Popular posts from this blog

व्ही.पी.एस मध्ये ८०वा स्वातंत्र दिन साजरा

व्ही.पी.एस मध्ये दीप अमावस्या साजरी

विद्यार्थ्यांनी घेतला अध्यापनाचा अनुभव