महर्षी व्यास जयंती साजरी
लोणावळा, संपादक : संजय पालवे
विद्या प्रसारिणी सभेच्या व्ही.पी.एस हायस्कूल व द.पू.मेहता कनिष्ठ महाविद्यालयामध्ये महर्षी व्यास जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्रशालेचे उपमुख्याध्यापक श्री.विजय रसाळ होते. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे शाळा समिती सदस्य श्री.धीरूभाई कल्याणजी होते. मांच्यावर पर्यवेक्षक श्री.श्रीनिवास गजेंद्रगडकर, श्री.अनिल खामकर, शिक्षक प्रतिनिधी श्रीमती स्नेहलता कांबळे आणि शिक्षकेतर प्रतिनिधी श्री.सचिन थोरात उपस्थित होते.
गुरु पौर्णिमा निमित्त डॉ.वर्षा तोडमल यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजनाने झाली. प्रमुख व्याख्यात्याचा परिचय पर्यवेक्षक श्री.अनिल खामकर यांनी करून दिला. आपल्या प्रमुख व्याख्यानामध्ये डॉ.वर्षा तोडमल यांनी सांगितले शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या मनाचा ठाव कसा घ्यावा याविषयी सर्वांना मार्गदर्शन केले. श्री.धीरूभाई कल्याणजी, श्री.विजय रसाळ यांनी देखील आपले मनोगते व्यक्त केली. श्री.श्रीनिवास गजेंद्रगडकर यांनी सर्व शिक्षकांना गुरु पौर्णिमा निमित्त शुभेच्छा दिल्या.
शिक्षक मनोगता मधून श्री.हरिभाऊ कुलकर्णी आणि श्रीमती गौरी खंडेलवाल यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री.संजय पालवे, सूत्रसंचालन श्री.सोमनाथ ढुमणे तर आभार श्री.वैभव सूर्यवंशी यांनी मांनले.
विद्या प्रसारिणी सभेच्या नियामक मंडळ अध्यक्षा डॉ.मृणालिनी गरवारे कार्यवाह डॉ.सतीश गवळी सहकार्यवाह श्री.विजयजी भुरके आणि नियामक मंडळ सदस्य तथा शाला समिती अध्यक्ष श्री.भगवानभाऊ आंबेकर यांनी शिक्षकांना गुरु पौर्णिमा निमित्त शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमासाठी शिक्षकानं बरोबर सेवक श्री.मयूर पवार, श्री.सीताराम घारे, श्री.आढाव, श्री.विकास आढाव यांचे सहकार्य लाभले.