विद्यार्थिनींनी गिरवले स्वसंरक्षणाचे धडे
लोणावळा, संपादक:संजय पालवे
विद्या प्रसारिणी सभेच्या व्ही.पी.एस हायस्कूल व द.पू.मेहता कनिष्ठ महाविद्यालयामध्ये लायन्स क्लब ऑफ लोणावळा यांच्यावतीने शालेय विद्यार्थिनींसाठी स्वसंरक्षणाचे धडे देण्यात आले.
समाजामध्ये वावरत असताना महिला, बालिका आणि विद्यार्थिनी यांच्यावर वेगवेगळ्या माध्यमातून अत्याचार होताना दिसतात. त्यांच्यावर होणाऱ्या अन्याय आणि अत्याचाराला वाचा फोडणे, प्रत्युत्तर देणे किंवा स्वसंरक्षण करणे फार महत्त्वाचे असते. आपले स्वसंरक्षण कसे करावे या विषयावर अनेक सामाजिक संस्था जनजागृती आणि मार्गदर्शन करतात. प्रशालेमध्ये लायन्स क्लब ऑफ लोणावळा आयोजित आणि ज्येष्ठ लिपीक श्री.कुंडलिक आंबेकर यांच्या समन्वयाने विद्यार्थिनीसाठी स्वसंरक्षण कसे करावे याचे धडे प्रात्यक्षिका द्वारे देण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशालेचे प्राचार्य श्री.सुहास विसाळ होते. कार्यक्रमासाठी श्री.अमित वाडीवाला (लायन्स क्लब ऑफ लोणावळा), श्री. सुधीर कदम (डिस्ट्रिक्ट चेअरमन), श्री.शाहीन विरजी (सोशल वर्कर इन कॅनडा), श्री.सुरैया वाडीवाला (प्रेसिडेंट लाइन्स क्लब) तर प्रमुख पाहुणे श्री.
अभय शास्त्री (मा.डिस्ट्रिक्ट गव्हर्नर) उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थिनींना मोलाचे मार्गदर्शन केले.
विद्यार्थिनींसाठी स्वसंरक्षण पर प्रात्यक्षिके कनिष्ठ महाविद्यालयासाठी सकाळ सत्रामध्ये तर हायस्कूल मधील विद्यार्थिनींसाठी दुपार सत्रामध्ये आयोजन करण्यात आले. प्रात्यक्षिके दाखवण्यासाठी कु.रूपाली पवार (मिस महाराष्ट्र कराटे ब्लॅक बेल्ट) होत्या. त्यांनी विद्यार्थिनींना प्रात्यक्षिकाद्वारे आत्मसंरक्षण कसे करावे याचे प्रात्यक्षिके करून दाखवली .
प्रसंगी मंचावर उपमुख्याध्यापक श्री. विजय रसाळ, पर्यवेक्षक श्री.श्रीनिवास गजेंद्रगडकर, श्री.अनिल खामकर, पर्यवेक्षिका श्रीमती अक्षता पाध्ये, शिक्षक प्रतिनिधी श्रीमती स्नेहलता कांबळे आणि ज्येष्ठ लिपिक श्री.कुंडलिक आंबेकर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन श्रीमती वैशाली तारु आणि श्रीमती स्वाती पाटील तर आभार श्रीमती स्नेहलता कांबळे आणि श्रीमती सिद्धी साखळकर यांनी मांनले. विद्यार्थी बैठक व्यवस्था श्रीमती रेवती बोके आणि श्री.ज्ञानेश्वर बुरांडे यांनी केली. कार्यक्रमासाठी श्री.धनंजय काळे, श्री.वैभव काब्दे, श्री.संकेत कवडे तर सेवक श्री.तुकाराम वैद्य आणि श्री.मयूर पवार यांनी मोलाचे सहकार्य केले.