चिमुकल्यांनी घेतला दिंडीचा अनुभव

लोणावळा, संपादक:संजय पालवे 
    विद्या प्रसारिणी सभा संस्थेचे व्ही. पी. एस प्राथमिक विद्यालय लोणावळा येथील शाळेत इ.1 ली ते 4थी च्या विद्यार्थ्यासाठी पालखी सोहळा आयोजित करण्यात आला.
सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती । रखुमाईच्या पती सोयरिया ॥१॥
गोड तुझें रूप गोड तुझें नाम । देईं मज प्रेम सर्व काळ ॥ ॥
विठो माउलिये हा चि वर देईं । संचरोनि राहीं हृदयामाजी ॥२॥
तुका म्हणे कांहीं न मागे आणीक । तुझे पायीं सुख सर्व आहे ॥३॥

    पंढरीची वारी म्हणजे महाराष्ट्रात साजरी होणारा एक मोठा सणच. हा सण म्हणजे फक्त हरिनामाचा गजर आणि निस्सीम भक्ती. आषाढाची चाहूल लागताच मनाला ओढ लागते ती पंढरीच्या वारीची. हरिमय झालेले असंख्य वारकरी कित्येक किलोमीटरचा रस्ता तुडवत त्या पांडुरंग परमात्म्याला पाहण्यासाठी जातात, आणि हा अनुपम सोहळा उभा महाराष्ट्र तल्लीन होऊन पाहत असतो. अशा प्रकारचा आगळा वेगळा पालखी सोहळा शाळेत उत्साहात साजरा केला.
     कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी व्ही.पी. एस हायस्कूल चे प्राचार्य श्री.सुहास विसाळ सर होते. तसेच व्ही.पी.एस इंग्लिश टिचिंग स्कूलचे मुख्याध्यापक श्री . दत्तात्रय पोटे सर उपस्थित होते.
     कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.मंगल जाधव मॅडम यांनी केले.वारीची माहिती,आपली मराठी संस्कृती याचे महत्व गोष्टीरूपी समर्पक भाषेत शाळेतील शिक्षिका सौ. मनिषा जरग यांनी विद्यार्थ्यांना समजून सांगितले.शाळेतील विद्यार्थी सुंदर वारकरी बनून नटून थटून आले होते.संत तुकाराम,संत ज्ञानेश्वर संत गोरा कुंभार, संत नामदेव, समर्थ रामदास, संत एकनाथ, संत निवृत्तीनाथ,संत मुक्ताबाई, संत जनाबाई अशा वेगवेगळ्या वेशभूषा करून विद्यार्थी आले होते.
     विद्यार्थ्यांनीआपल्या वाणीतून सुंदर अभंग गायन सादर केले.दिंडीत वृक्ष संवर्धनाचा संदेश देण्यात आला.ज्ञानोबा तुकाराम चा जयघोष करीत रिंगण सोहळा  कार्यक्रम पार पडला. त्यात फुगडी खेळणारे,टाळकरी, तुळशी वृंदावन घेऊन पाळणारे अशा वारकऱ्यांनी रिंगण सोहळ्यात आपली कला सादर केली. नियामक मंडळ अध्यक्षा डॉ. मृणालिनी गरवारे, कार्यवाह डॉ. श्री. सतीशजी गवळी सर, सहकार्यवाह श्री. विजयजी भुरके सर यांनी विद्यार्थ्यांना पालखी सोहळा कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्या. 
    कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सौ. मनिषा जरग, सौ. सुनिता वरे,सौ.कविता पंगुडवाले सौ. संगिता पाटील , सौ.प्राजक्ता दिवसे, श्रीमती स्वप्नाराणी भालेराव शिक्षक श्री संजय भालचिम, श्री. प्रकाश पाटील,श्री. हनुमंत शिंदे, श्री. अमित रसाळ यांनी विशेष परिश्रम घेतले. तसेच शिक्षकेतर कर्मचारी श्रीमती जयश्री बागलकोटे यांनी मेहनत घेतली.
     कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्री.प्रकाश पाटील यांनी केले तर सौ. सुनिता वरे यांनी आभार मानले.

Popular posts from this blog

व्ही.पी.एस मध्ये ८०वा स्वातंत्र दिन साजरा

व्ही.पी.एस मध्ये दीप अमावस्या साजरी

विद्यार्थ्यांनी घेतला अध्यापनाचा अनुभव