नागपंचमीनिमित्त मेहंदी स्पर्धेचे आयोजन
लोणावळा, संपादक : संजय पालवे
विद्या प्रसारिणी सभेच्या व्ही.पी.एस हायस्कूल व द.पू. मेहता कनिष्ठ महाविद्यालयामध्ये नागपंचमी निमित्त मेहंदी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
दरवर्षीप्रमाणे नागपंचमीच्या निमित्ताने सांस्कृतिक विभागातर्फे प्रशालेतील विद्यार्थिनींसाठी मेहंदी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. उत्कृष्ट मेंहदी काढणाऱ्या विद्यार्थ्यांनीना नंबर देण्यात आले.
मेहंदी स्पर्धेचे नियोजन दोन सत्रात करण्यात आले. पहिल्या सत्रामध्ये इयत्ता पाचवी ते सातवी मधील 240 विद्यार्थिनींनी सहभाग घेतला तर दुसऱ्या सत्रामध्ये इयत्ता आठवी आणि नववी मधील 178 विद्यार्थिनींनी सहभाग घेतला. विद्यार्थिनींनी स्वतःच्या आणि आपल्या मैत्रिणीच्या हातावर सुंदर मेहंदी काढली. स्पर्धेचे नियोजन सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री.धनंजय काळे आणि श्री.योगेश कोठावदे यांनी केले. दोन्ही सत्रांमध्ये स्पर्धेचे पर्यवेक्षण श्रीमती सुनिता बनकर आणि स्वाती व्हरांबळे यांनी केले.
स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थिनी आणि त्यांच्या उत्कृष्ट कलेचे कौतुक प्राचार्य श्री.सुहास विसाळ, उपमुख्याध्यापक श्री.विजय रसाळ, पर्यवेक्षक श्री.श्रीनिवास गजेंद्रगडकर, श्री. अनिल खामकर, पर्यवेक्षिका श्रीमती अक्षता पाध्ये यांनी केले.
स्पर्धा पार पाडण्यासाठी श्री.संजय पालवे, श्री.संकेत कवडे आणि श्री.श्रीकांत म्हसकर यांचे सहकार्य लाभले. स्पर्धेदरम्यान प्रतिनिधी श्रीमती स्नेहलता कांबळे, श्रीमती अनुजा गोसावी, श्रीमती सई सर्जेराव, श्रीमती किरण मस्के, श्रीमती शिवानी बागलाने यांनी भेट दिली. सेवक श्री.मयूर पवार यांनी प्रकाश हॉलची व्यवस्था केली.
मेहंदी स्पर्धेच्या उत्तम नियोजनाचे नियामक मंडळ अध्यक्षा डॉ.मृणालिनी गरवारे, कार्यवाह डॉ. सतीश गवळी, सहकार्यवाह श्री.विजयजी भुरके आणि नियामक मंडळ सदस्य तथा शाळा समिती अध्यक्ष श्री.भगवानभाऊ आंबेकर यांनी कौतुक केले.