ऑलिम्पियाड बक्षीस वितरण सोहळा संपन्न

लोणावळा, संपादक : संजय पालवे
     विद्या प्रसारिणी सभेच्या व्ही.पी.एस हायस्कूल व द.पू.मेहता कनिष्ठ महाविद्यालयामध्ये विद्यार्थांसाठी नेहमी विविध उपक्रम राबविण्यात येतात. अशीच इंडियन टॅलेंट ऑलिम्पियाड स्पर्धा परीक्षेचे आयोजन प्रशालेमध्ये करण्यात आले होते.
    सदर परीक्षेसाठी 215 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते त्या पैकी 119 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून त्यांची अंतिम फेरीसाठी निवड झाली आहे. सर्वात उल्लेखनीय बाब म्हणजे एका विद्यार्थ्याने राज्यात तिसरा क्रमांक मिळवला असून याला 1200 रुपयाचे रोख बक्षीस मिळाले.
     विद्यार्थांनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरी बद्दल दहा विद्यार्थ्यांना क्लास टॉपर पुरस्कार मिळाला तर तीन विद्यार्थ्यांना एक्सलन्स पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. परीक्षेसाठी विद्यार्थ्यांची तयारी करणे आणि त्याचे नियोजन करणे याची जबाबदारी श्री.श्रीकांत म्हसकर यांनी परपडली.
     विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण प्राचार्य श्री.सुहास विसाळ, उपमुख्याध्यापक श्री. विजय रसाळ, पर्यवेक्षक श्री.श्रीनिवास गजेंद्रगडकर, श्री.अनिल खामकर, पर्यवेक्षिका श्रीमती अक्षता पाध्ये आणि शिक्षक प्रतिनिधी श्रीमती स्नेहलता कांबळे,  यांच्या हस्ते करण्यात आले.
     विद्यार्थांनी मिळवलेल्या यशाबद्दल नियामक मंडळ अध्यक्षा डॉ.मृणालिनी गरवारे, कार्यवाह डॉ.सतीश गवळी, सहकार्यवाह श्री.विजयजी भुरके, नियामक मंडळ सदस्य तथा शाळा समिती अध्यक्ष श्री.भगवानभाऊ आंबेकर यांनी कौतुक केले.
     
      

Popular posts from this blog

व्ही.पी.एस मध्ये ८०वा स्वातंत्र दिन साजरा

व्ही.पी.एस मध्ये दीप अमावस्या साजरी

विद्यार्थ्यांनी घेतला अध्यापनाचा अनुभव