लोकमान्य टिळक पुण्यतिथी आणि अण्णाभाऊ साठे जयंती साजरी
लोणावळा, संपादक:संजय पालवे
विद्या प्रसारिणी सभेच्या व्ही.पी.एस हायस्कूल व द.पू. मेहता कनिष्ठ महाविद्यालयामध्ये लोकमान्य टिळक पुण्यतिथी आणि लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती निमित्त वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य श्री.सुहास विसाळ होते. त्याचबरोबर मंचावर उपमुख्याध्यापक श्री.विजय रसाळ, उपप्राचार्य श्री आदिनाथ दहिफळे, पर्यवेक्षक श्री.श्रीनिवास गजेंद्रगडकर, श्री. अनिल खामकर, पर्यवेक्षिका श्रीमती अक्षता पाध्ये, मुख्य लिपिक श्री कुंडलिक आंबेकर आणि शिक्षकेतर प्रतिनिधी वरिष्ठ लिपिक श्री.सचिन थोरात उपस्थित होते.
मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन करून अभिवादन करण्यात आले. लोकमान्य टिळक पुण्यतिथी आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीचे औचित्य साधून प्रशालेमध्ये वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले समिती प्रमुख श्री.वैभव सूर्यवंशी यांनी स्पर्धेचे नियोजन केले.
वक्तृत्व स्पर्धेसाठी आठवी ते दहावी मधील बत्तीस विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. स्पर्धेचे परीक्षण जेष्ठ शिक्षक श्री. हरिभाऊ कुलकर्णी आणि श्रीमती मनीषा खेडकर यांनी केले. सर्वच विद्यार्थ्यांनी छान मनोगते सादर केली. सहभागी विद्यार्थ्यांपैकी इयत्ता आठवी गटामधून कु.दर्शना पालकर (प्रथम), कु. आदिती पोवार (द्वितीय), इयत्ता नववी गटामधून कु.दिव्या चव्हाण (प्रथम), कु.स्वरूपा हरपुडे (द्वितीय), इयत्ता दहावी गटामधून चि.राजकुमार पाटील (प्रथम), आणि कु.तनिष्का मांजरे (द्वितीय) यांनी क्रमांक पटकावले. प्रत्येक गटामधील प्रथम आणि द्वितीय येणाऱ्या विद्यार्थ्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देऊन त्यांचे कौतुक करण्यात आले.
प्रशालेचे ज्येष्ठ शिक्षक श्री.पी.बी. राहिंज यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.संजय पालवे, प्रास्ताविक श्री.वैभव सूर्यवंशी, फलकलेखन श्री.महेश चोणगे तर आभार सांस्कृतिक समिती प्रमुख श्री.धनंजय काळे यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी श्री.संकेत कवडे, श्रीमती वैशाली ढाकणे, श्रीमती सुनिता बनकर, श्रीमती शिवानी बागलाने, श्री.मुकुंद शिंदे, श्री.जयवंत सिसोदे, श्री.दत्तात्रय सुरवसे तसेच सेवक श्री.गजानन कदम, श्री.सचिन गवळी यांचे सहकार्य लाभले.
नियामक मंडळ अध्यक्षा डॉ. मृणालिनी गरवारे, कार्यवाह डॉ.सतीश गवळी, सहकार्यवाह श्री.विजयजी भुरके आणि नियामक मंडळ सदस्य तथा समिती अध्यक्ष श्री.भगवानभाऊ आंबेकर यांनी वक्तृत्व स्पर्धेमधील बक्षीस प्राप्त विद्यार्थ्यांचे कौतुक केले.