गोपाळकाला निमित्त दहीहंडीचे आयोजन

लोणावळा, संपादक:संजय पालवे 
     विद्या प्रसारिणी सभेच्या व्ही.पी.एस हायस्कूल व द.पू.मेहता कनिष्ठ महाविद्यालयामध्ये गोपाळकाल्यानिमित्त दहीहंडीचे आयोजन करण्यात आले.
   दरवर्षीप्रमाणे याही वर्षी गोपाळकाल्या निमित्त प्रशालेमध्ये इयत्ता पाचवी ते दहावी शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी दहीहंडीचे आयोजन करण्यात आले. 
     प्रशालेचे प्राचार्य श्री.सुहास विसाळ, उपमुख्याध्यापक श्री.विजय रसाळ, पर्यवेक्षक श्री.श्रीनिवास गजेंद्रगडकर, श्री.अनिल खामकर, पर्यवेक्षिका श्रीमती अक्षता पाध्ये शिक्षक प्रतिनिधी श्रीमती स्नेहलता कांबळे आणि शिक्षकेतर प्रतिनिधी श्री.सचिन थोरात यांच्या हस्ते भगवान श्रीकृष्ण आणि दहीहंडीची पूजा करण्यात आली.
      दहीहंडीला सलामी देण्यासाठी प्रत्येक वर्गामधील विद्यार्थ्यांना आवाहन करण्यात आले. विद्यार्थांनी तीन - चार स्तरापर्यंत मनोरेरचत सलामी दिली. श्री.श्रीकांत म्हसकर यांच्या मार्गदर्शनाने ढोल पथकाने छान साथ दिली. शेवटी दहीहंडी फोडल्या नंतर विद्यार्थांना खाऊचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांना दहीहंडीचे महत्व समजावे यासाठी उपमुख्याध्यापक श्री. विजय रसाळ आणि पर्यवेक्षिका श्रीमती अक्षता पाध्ये यांनी माहिती सांगितली. शालेय प्रोजेक्टरवर श्रीकृष्णाचे बाल स्वरूप दाखवण्यात आले.
     कार्यक्रमाचे नियोजन सांस्कृतिक समिती प्रमुख श्री.धनंजय काळे आणि श्री.योगेश कोठावदे यांनी केले. श्री.सोमनाथ ढुमणे श्री.वैभव सूर्यवंशी श्री.संजय पालवे, श्री.शिवकुमार दहिफळे, श्री.मोहनराव ढाणे, श्री.मुकुंद शिंदे, श्री.भीमराव राऊत, श्रीमती वैशाली तारू, श्री.सुभाष क्षीरसागर, श्री.पी.बी.राहिंज आणि श्री.रवींद्र गोसावी यांनी मोलाचे सहकार्य केले. श्री.महेश चोणगे आणि श्री.विक्रम शिंदे यांनी सुंदर फलकलेखन केले. सेवक श्री गजानन कदम श्री. सीताराम घारे, श्री.सीताराम वैद्य, श्री.मुकुंद जगताप यांनी सहकार्य केले.
    नियामक मंडळ अध्यक्षा डॉ. मृणालिनी गरवारे, कार्यवाह डॉ.सतीश गवळी, सहकार्यवाह श्री.विजयजी भुरके नियामक मंडळ सदस्य तथा शाळा समिती अध्यक्ष श्री.भगवान भाऊ आंबेकर यांनी शिक्षक, सेवक आणि विद्यार्थ्यांना गोपाळकाल्याच्या शुभेच्छा दिल्या.

     

Popular posts from this blog

व्ही.पी.एस मध्ये ८०वा स्वातंत्र दिन साजरा

व्ही.पी.एस मध्ये दीप अमावस्या साजरी

विद्यार्थ्यांनी घेतला अध्यापनाचा अनुभव