७९ वा स्वातंत्र्य दिन साजरा

लोणावळा, संपादक:संजय पालवे 
     विद्या प्रसारिणी शुभेच्छा व्ही.पी.एस हायस्कूल व द.पू. मेहता कनिष्ठ महाविद्यालयामध्ये ७९ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा झाला.
   स्वतंत्र दिनानिमित्त प्रशालेमध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. राष्ट्रगीत, राज्यगीत, ध्वजगीत, संचलन, समूहगीत व अध्यक्षीय मनोगत यांचा समावेश होता. यावर्षी प्रशालेचे प्राचार्य श्री.सुहास विसाळ यांच्या हस्ते ध्वज पूजन व ध्वजारोहण करण्यात आले.              कार्यक्रमासाठी शाळा समिती सदस्य श्री.धीरूभाई कल्याणजी, श्री राजेशजी मेहता, प्राचार्य श्री.सुहास विसाळ, उपमुख्याध्यापक श्री.विजय रसाळ, उपप्राचार्य श्री.आदिनाथ दहिफळे, श्री.चंद्रकांत भगत (प्राचार्य बी.सी.एस), पर्यवेक्षक श्री.श्रीनिवास गजेंद्रगडकर, श्री.अनिल खामकर, पर्यवेक्षिका श्रीमती अक्षता पाध्ये, श्रीमती मंगल जाधव ( मुख्याधपिका प्राथमिक विभाग), शिक्षक प्रतिनिधी श्रीमती स्नेहलता कांबळे, शिक्षकेतर प्रतिनिधी श्री.सचिन थोरात, ज्येष्ठ लिपिक श्री.कुंडलिक आंबेकर, संगणक विभाग प्रमुख श्रीमती सविता सिंग आणि श्री.पवनजी शर्मा मॅनेजर, कॅनरा बँक (रिटायर्ड एअर फोर्स ऑफिसर), श्री.राजेश पांडे असिस्टंट मॅनेजर, कॅनरा बँक (रिटायर्ड नेव्ही ऑफिसर) उपस्थित होते.
    श्री.धनंजय काळे, श्री.हरिभाऊ कुलकर्णी, श्रीमती स्वाती पोटफोडे, श्रीमती साक्षी वाणी यांनी बसवलेले समूहगीते व वैयक्तिक गीते सादर करण्यात आली.
    नियामक मंडळ अध्यक्षा डॉ.मृणालिनी गरवारे, कार्यवाह डॉ.सतीश गवळी, सहकार्यवाह श्री.विजयजी भुरके, नियामक मंडळ सदस्य तथा शाळा समिती अध्यक्ष श्री.भगवानभाऊ आंबेकर यांनी स्वातंत्र्यदिनानिमित्त पदाधिकारी, शिक्षक बंधू-भगिनी, सेवक वर्ग आणि विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि प्रास्ताविक श्रीमती रेवती बोके यांनी केले. संचलन आणि वाद्य पथक तयारी श्री.संजय पालवे आणि श्रीमती वैशाली तारु तर ध्वज बांधणी श्री.भीमराव राऊत आणि श्री.ज्ञानेश्वर बुरांडे यांनी केले. श्री. गजानन कदम, श्री.सिताराम वैद्य, श्री.सीताराम घारे, श्री.मुकुंद जगताप, श्री.मयूर पवार यांनी आपापल्या जबाबदाऱ्या पार पाडल्या.
     

Popular posts from this blog

व्ही.पी.एस मध्ये ८०वा स्वातंत्र दिन साजरा

व्ही.पी.एस मध्ये दीप अमावस्या साजरी

विद्यार्थ्यांनी घेतला अध्यापनाचा अनुभव