व्यसनमुक्ती व्याख्यानाचे आयोजन

लोणावळा, संपादक : संजय पालवे 
     विद्या प्रसारिणी सभेच्या व्ही.पी.एस हायस्कूल व द.पू. मेहता कनिष्ठ महाविद्यालयामध्ये व्यसनमुक्ती व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. 
      बी.एम.सी.सी कॉलेजचे विद्यार्थी आणि प्राध्यापिका श्रीमती विनया हसमनिस यांनी हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना पीपीटी आणि व्याख्याना द्वारे मार्गदर्शन केले. प्रशालेच्या पर्यवेक्षिका श्रीमती अक्षता पाध्ये यांच्या प्रयत्नाने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.
     प्रसंगी श्रीमती विनया हसमनिस यांनी विद्यार्थ्यांना व्यसन म्हणजे काय? व्यसनाचे प्रकार कोणते? व्यसनाचे आपल्या शरीरावर होणारे परिणाम कोणते? आणि आपण केलेल्या व्यसनामुळे आपल्या कुटुंबावर आणि समाजवर काय परिणाम होतो ? याचे सविस्तर मार्गदर्शन केले. 
      प्राचार्य श्री.सुहास विसाळ, उपमुख्याध्यापक श्री.विजय रसाळ, उपप्राचार्य श्री.आदिनाथ दहिफळे, पर्यवेक्षक श्री.श्रीनिवास गजेंद्रगडकर, श्री. अनिल खामकर आणि पर्यवेक्षिका श्रीमती अक्षता पाध्ये उपस्थित होते. प्रशालेमध्ये छान प्रकल्प राबवल्याबद्दल प्राचार्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांचे कौतुक केले तसेच प्राध्यापिका श्रीमती विनया हसमनिस यांचे आभार मानले. 
     व्याख्यानाप्रसंगी श्री.वैभव सूर्यवंशी, श्री.संकेत कवडे, श्री.संजय पालवे, श्री.श्रीकांत म्हसकर, श्री.दत्तात्रय सुरवसे, श्री.दिनेश परचंड, श्रीमती सुनिता बनकर, श्री.शिवकुमार दहिफळे, श्री रवींद्र गोसावी श्री.धनंजय काळे आणि श्री.मोहनराव ढाणे उपस्थित होते. सेवक श्री.मयूर पवार यांचे उत्तम सहकार्य मिळाले.

Popular posts from this blog

व्ही.पी.एस मध्ये ८०वा स्वातंत्र दिन साजरा

व्ही.पी.एस मध्ये दीप अमावस्या साजरी

विद्यार्थ्यांनी घेतला अध्यापनाचा अनुभव