ढोल ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप
लोणावळा, संपादक:संजय पालवे
विद्या प्रसारिणी सभेच्या व्ही.पी.एस हायस्कूल व द.पू.मेहता कनिष्ठ महाविद्यालयामध्ये ढोल ताशांच्या गजरामध्ये गणपती बाप्पाला भक्तिभावाने निरोप देण्यात आला.
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी प्रशालेमध्ये गणेश उत्सव साजरा करण्यात आला. प्रशालेच्या कार्यालयामध्ये गणपती बाप्पाची स्थापना करण्यात आली. सात दिवस प्रशालेमध्ये भक्तीमय वातावरण होते. गणेश उत्सवानिमित्त प्रशालेमध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
सातव्या दिवसाचे गणपती बाप्पाचे विसर्जन भक्ती भावाने करण्यात आले. बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीसाठी शाळा समिती सदस्य श्री.धीरूभाई कल्याणजी, श्री.राजेशजी मेहता, प्राचार्य श्री.सुहास विसाळ, उपमुख्याध्यापक श्री.विजय रसाळ, उपप्राचार्य श्री.आदिनाथ दहिफळे, पर्यवेक्षक श्री.श्रीनिवास गजेंद्रगडकर, श्री. अनिल खामकर, पर्यवेक्षिका श्रीमती अक्षता पाध्ये, शिक्षक प्रतिनिधी श्रीमती स्नेहलता कांबळे, शिक्षकेतर प्रतिनिधी श्री.सचिन थोरात तसेच शिक्षक, सेवक आणि विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे नियोजन सांस्कृतिक समिती प्रमुख श्री धनंजय काळे व श्री.योगेश कोठावदे यांनी केले. विसर्जन मिरवणुकीसाठी श्री.श्रीकांत म्हसकर यांच्या मार्गदर्शनाखाली ढोल ताशाच्या पथकाचे आयोजन करण्यात आले. धो-धो पडणाऱ्या पावसामध्ये गणपती बाप्पाची विसर्जन मिरवणूक काढण्यात आली.
गणेशोत्सवासाठी नियामक मंडळ अध्यक्षा डॉ.मृणालिनी गरवारे, कार्यवाह डॉ. सतीश गवळी, सहकार्यवाह श्री. विजयजी भुरके आणि नियामक मंडळ सदस्य तथा शाळा समिती अध्यक्ष श्री. भगवानभाऊ आंबेकर यांनी विद्यार्थी, शिक्षक आणि सेवकांना शुभेच्छा दिल्या.