रोबोटिक लॅब उद्घाटन सोहळ्याचे आयोजन
लोणावळा, संपादक : संजय पालवे
विद्या प्रसारिणी सभेच्या व्ही.पी.एस हायस्कूल व द.पू.मेहता कनिष्ठ महाविद्यालयामध्ये मान्यवरांच्या हस्ते रोबोटिक लॅब उद्घाटन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.
संगणकीय युगामध्ये तंत्रज्ञानाची कास धरून आजचा विद्यार्थी पुढे जाऊ शकतो. टाटा टेक्नॉलॉजी आणि इंडिया स्टेम फाउंडेशन यांच्यावतीने प्रशालेतील विद्यार्थ्यांसाठी रोबोटिक लॅब चे उद्घाटन करण्यात आले.
रोबोटिक लॅब उद्घाटन कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या श्रीमती विनिता फणसाळकर होत्या. प्रसंगी मंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष कार्यवाह डॉ.सतीश गवळी, नियामक मंडळ सदस्य तथा शाळा समिती अध्यक्ष श्री.भगवानभाऊ आंबेकर, शाळा समिती सदस्य श्री.धीरूभाई
कल्याणजी, श्री.राजेशजी मेहता, प्राचार्य श्री.सुहास विसाळ, उपमुख्याध्यापक श्री. विजय रसाळ, उपप्राचार्य श्री.आदिनाथ दहिफळे, पर्यवेक्षक श्री.श्रीनिवास गजेंद्रगडकर, श्री.अनिल खामकर, पर्यवेक्षिका श्रीमती अक्षता पाध्ये, मुख्यलिपिक श्री.कुंडलिक आंबेकर, श्रीमती उमा कृष्णल, श्री.सारीपुत्र साबळे, श्री.बसवराज देवरुखकर, शिक्षक प्रतिनिधी श्रीमती स्नेहलता कांबळे, शिक्षकेतर प्रतिनिधी श्री.सचिन थोरात उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन करून करण्यात आली. प्रास्ताविक प्राचार्य श्री. सुहास विसाळ यांनी केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय उपमुख्याध्यापक श्री. विजय रसाळ यांनी करून दिला.
कार्यक्रमासाठी उपस्थित पाहुणे श्रीमती विनिता फनसाळकर यांनी आपल्या मनोगतामधून विद्यार्थ्यांना रोबोटिक लॅब चे महत्त्व आणि काळाची गरज याची छान सांगड घालून दिली. तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष कार्यवाह डॉ.सतीश गवळी यांनी आपल्या मनोगताद्वारे फौंडेशनचे आभार मानले. ए.आय आणि रोबोटिक लॅबचे महत्त्व विद्यार्थ्यांना सांगितले.
पाहुण्यांचे स्वागत स्काऊट आणि गाईड विद्यार्थांनी स्काऊट वाद्यपथकाने श्री.संजय पालवे यांच्या मार्गदर्शनाखाली केले. कार्यक्रमाची तयारी कलाशिक्षक श्री.योगेश कोठावदे, श्री.संकेत कवडे, श्रीमती माधुरी सानप, श्रीमती सुनिता इथापे आणि श्रीमती स्वाती व्हरांबळे यांनी सेवक श्री.गजानन कदम, श्री.मयूर पवार आणि श्री.मुकुंद जगताप यांच्या मदतीने केली.
उद्घाटन कार्यक्रमासाठी विद्या प्रसारिणी सभेच्या अध्यक्षा डॉ.मृणालिनी गरवारे मॅडम आणि सहकार्यवाह श्री. विजयजी भुरके यांनी शुभेच्छा दिल्या
ईशस्तवन आणि स्वागत गीत श्री. धनंजय काळे यांनी सादर केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.सोमनाथ ढुमणे तर उपस्थित मान्यवरांचे आभार पर्यवेक्षिका श्रीमती अक्षता पाध्ये यांनी मानले.