व्ही.पी.एस मध्ये महाभोंडल्याचे आयोजन

लोणावळा, संपादक:संजय पालवे 
     विद्या प्रसारिणी सभेच्या व्ही.पी.एस हायस्कूल व द.पू.मेहता कनिष्ठ महाविद्यालयामध्ये शारदीय नवरात्री निमित्त महाभोंडल्याचे आयोजन करण्यात आले.
    शारदीय नवरात्रीनिमित्त देशभरामध्ये भक्तीमय वातावरण असते. देवी मातेची पूजा केली जाते. गाव गावात, लहान मोठ्या शहरात मोठ्या प्रमाणावर गरब्याचे आयोजन करण्यात येते. विविध राजकीय पक्षातील मान्यवर आणि नामांकित सेलिब्रिटी गरब्याला आपली उपस्थिती दर्शवतात. 
     प्रशालेतील विद्यार्थिनींसाठी भोंडल्याचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात हस्त पूजनाने करण्यात आली. प्रशालेचे प्राचार्य श्री.सुहास विसाळ, उपमुख्याध्यापक श्री.विजय रसाळ, उपप्राचार्य श्री.आदिनाथ दहिफळे, पर्यवेक्षक श्री.श्रीनिवास गजेंद्रगडकर, श्री.अनिल खामकर, पर्यवेक्षिका श्रीमती अक्षता पाध्ये, जेष्ठ लिपिक श्री.कुंडलिक आंबेकर, शिक्षक प्रतिनिधी श्रीमती स्नेहलता कांबळे आणि शिक्षकेतर प्रतिनिधी श्री.सचिन थोरात यांच्या हस्ते हत्तीच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
     कोसळणाऱ्या पावसामध्ये देखील विद्यार्थिनींनी भोंडल्याचा फेर धरून आनंद घेतला. विद्यार्थिनींनी गरब्याच्या वेगवेगळ्या संगीतावर आनंद घेतला. प्रशालेतील शिक्षिकांनी भोंडल्याची‌ पारंपरिक गाणी गायली. कार्यक्रम संपल्यावर विद्यार्थिनींना खाऊचे वाटप करण्यात आले.
     कार्यक्रमाचे नियोजन सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री.धनंजय काळे आणि श्री.योगेश कोठावदे यांनी केले. कार्यक्रमासाठी शिक्षक, शिक्षिका आणि सेवकांनी उत्तम सहकार्य केले.
      महाभोंडल्या निमित्त नियामक मंडळ अध्यक्षा डॉ.मृणालिनी गरवारे, कार्यवाह डॉ.सतीश गवळी, सहकार्यवाह श्री. विजयजी भुरके आणि नियामक मंडळ सदस्य तथा शाळा समिती अध्यक्ष श्री.भगवानभाऊ आंबेकर यांनी शुभेच्छा दिल्या.
      

Popular posts from this blog

व्ही.पी.एस मध्ये ८०वा स्वातंत्र दिन साजरा

व्ही.पी.एस मध्ये दीप अमावस्या साजरी

विद्यार्थ्यांनी घेतला अध्यापनाचा अनुभव