‘मराठी अभिजात भाषा ’ सप्ताह साजरा
लोणावळा, संपादक:संजय पालवे
विद्या प्रसारिणी सभेच्या व्ही.पी.एस हायस्कूल व द.पू.मेहता कनिष्ठ महाविद्यालयामध्ये मराठी अभिजात भाषा दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
प्रत्येक राज्याची राज्य भाषा ही वेगळी आहे. महाराष्ट्राची राज्य भाषा मराठी आहे. परंतु इंग्रजीचा वाढता प्रभाव आणि मराठी भाषेसाठी असलेली उदासीनता यामुळे मराठी भाषेचा प्रभाव कमी होताना दिसू लागला आहे. यासाठी राज्यातील काही मराठी भाषाप्रेमी संघटनांनी ' मराठी भाषा वाचवा ’ अशी हाक मराठी माणसाला आणि राज्य शासनाला दिली.
यासाठीच शासनाकडून राज्यभर ‘अभिजात मराठी भाषा सप्ताह ’ साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले. याच धर्तीवर व्ही.पी.एस हायस्कूल व द.पू.मेहता कनिष्ठ महाविद्यालयामध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. निबंध लेखन, काव्य वाचन, काव्य गायन आणि नाट्य स्पर्धा अशा विविध स्पर्धेचे आयोजन आठवडाभर करण्यात आले.
सप्ताहाच्या शेवटी ग्रंथ पूजन करून ग्रंथदिंडी काढण्यात आली. यानिमित्त प्रशालेच्या प्रकाश हॉलमध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळा समिती अध्यक्ष श्री. भगवानभाऊ आंबेकर होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.सचिन लांडगे यांनी केले. प्राचार्य श्री.सुहास विसाळ, उपप्राचार्य श्री. आदिनाथ दहिफळे, ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती लोणकर आणि श्री.कल्याण चौघुले यांनी आपल्या मनोगतांमधून मराठी भाषेचे महत्व सांगितले.
ग्रंथपूजन नियामक मंडळ सदस्य तथा शाळा समिती अध्यक्ष श्री.भगवानभाऊ आंबेकर, नियामक मंडळ सदस्य तथा शाळा समिती सदस्य श्री.संदीप आगरवाल, शाळा समिती सदस्य श्री.धीरूभाई कल्याणजी, श्री.राजेशजी मेहता, प्राचार्य श्री सुहास विसाळ, उपमुख्याध्यापक श्री.विजय रसाळ, उपप्राचार्य श्री.आदिनाथ दहिफळे, पर्यवेक्षक श्री.श्रीनिवास गजेंद्रगडकर, श्री.अनिल खामकर, पर्यवेक्षिका श्रीमती अक्षता पाध्ये, शिक्षक प्रतिनिधी श्रीमती स्नेहलता कांबळे, शिक्षकेतर प्रतिनिधी श्री.सचिन थोरात, ज्येष्ठ लिपिक श्री. कुंडलिक आंबेकर आणि श्री.निलेश ढाकोळ यांच्या हस्ते झाले.
ढोल ताशांच्या गजरामध्ये दिंडीला हिरवा कंदील दाखवला. लोणावळा परिसरामध्ये दिंडी फिरवण्यात आली. पारंपरिक पोशाखामध्ये विद्यार्थांनी सहभाग घेतला. लोणावळा परिसरातील नागरिकांना मराठी भाषेचे महत्व ज्ञात व्हावे हाच यामागिल उद्देश होय. विद्यार्थांनी मराठी भाषेचा जयघोष केला. प्रसंगी कनिष्ठ महाविद्यालयामधील शिक्षक उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता श्रीमती सिद्धी साखळकर यांच्या पसायदानाने गायनाने झाली.
नियामक मंडळ अध्यक्षा डॉ.मृणालिनी गरवारे, कार्यवाह डॉ.सतीश गवळी आणि सहकार्यवाह श्री.विजयजी भुरके यांनी कौतुक केले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रम पारपाडण्यासाठी शिक्षक आणि सेवकांचे मोलाचे सहकार्य लाभले.