व्ही.पी.एस मध्ये पारंपरिक पद्धतीने दीपोत्सव साजरा
लोणावळा, संपादक:संजय पालवे
विद्या प्रसारिणी सभेच्या व्ही.पी.एस हायस्कूल व द.पू.मेहता कनिष्ठ महाविद्यालयामध्ये पारंपरिक पद्धतीने दीपोत्सव साजरा करण्यात आला.
दरवर्षी दीपावली सुट्टी लागण्यापूर्वी विद्यार्थ्यांनी जमवलेल्या पणत्याने शाळेची इमारत दिव्यांनी उजळून निघते. यंदा विद्यार्थ्यांनी जमवलेल्या पणत्या आणि शाळेतून उपलब्ध झालेल्या पणत्या अशा जवळपास तीन ते साडेतीन हजार पणत्याने शालेय इमारत उजळून निघाली.
नियामक मंडळ सदस्य तथा शाळा समिती अध्यक्ष श्री.भगवानभाऊ आंबेकर कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. व्ही.पी.एस प्राथमिक विद्यालयाचे शाळा समिती अध्यक्ष श्री.अरविंदभाई मेहता व्ही.पी.एस शाळा समिती सदस्य श्री.धीरूभाई कल्याणजी, श्री.राजेशजी मेहता, प्राचार्य श्री.सुहास विसाळ, उपमुख्याध्यापक श्री.विजय रसाळ उपप्राचार्य श्री.आदिनाथ दहिफळे, पर्यवेक्षक श्री.श्रीनिवास गजेंद्रगडकर, श्री अनिल खामकर, पर्यवेक्षिका श्रीमती अक्षता पाध्ये, शिक्षक प्रतिनिधी श्रीमती स्नेहलता कांबळे, शिक्षकेतर प्रतिनिधी श्री.सचिन थोरात, जेष्ठ लिपिक श्री.कुंडलिक आंबेकर, श्रीमती संजीवनी आंबेकर आणि श्री.चंद्रकांत जोशी उपस्थित होते.
मैदानावर दीपमाळेची सुंदर प्रतिकृती तयार करून दिव्यांनी आणि फुलांच्या पाकळ्यांनी सजवण्यात आली. स्काऊट गाईड आणि शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी आणि शिक्षिकांनी सुंदर रांगोळी काढली. प्राचार्य श्री.सुहास विसाळ यांनी उपस्थित पालक आणि विद्यार्थ्यांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे नियोजन श्री.संजय पालवे श्री.योगेश कोठावदे, श्री.संकेत कवडे आणि ज्ञानेश्वर बुरांडे यांनी केले. कार्यक्रमासाठी श्री. महेश चोणगे, श्री.विक्रम शिंदे, श्रीमती वैशाली तारु, श्रीमती सुनिता बनकर आणि श्रीमती स्वाती व्हरांबळे यांनी मदत केली. सेवक श्री सीताराम घारे, श्री.प्रकाश आढाव, श्री.मुकुंद जगताप, श्री.मयूर पवार आणि श्री.गजानन कदम यांनी मदत केली. दीपोत्सवासाठी विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थी व पालकांना खाऊचे वाटप करण्यात आले.
नियामक मंडळ अध्यक्षा डॉ.मृणालिनी गरवारे, कार्यवाह डॉ.सतीश गवळी सहकार्यवाह श्री.विजयजी भुरके यांनी विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.