‘वंदे मातरम्’ राष्ट्रीय गीत गायक सोहण्याचे आयोजन

लोणावळा, संपादक :संजय पालवे 
      ‘ वंदे मातरम् ’ बकिमचंद्र चटर्जी लिखित राष्ट्रीय गीताला 150 वर्ष पूर्ण होत असल्याचे औचित्य साधून राष्ट्रीय गीत गायनाचे आयोजन लोणावळा नगरपालिकेतर्फे करण्यात आले. 
    वंदे मातरम् गीताला आज 150 वर्ष पूर्ण होत आहे.या निमित्ताने लोणावळा नगरपरिषदे कडून लोणावळा परिसरातील सर्व शाळा, विद्यालय आणि महाविद्यालयांना आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार सर्व शाळांनी विद्यार्थ्यांकडून वंदे मातरम् संपूर्ण गीताचे पठाण करून घेतले.
     7 नोव्हेंबर रोजी लोणावळ्या नगरपरिषदेच्या प्रांगणामध्ये सर्व शाळेतील विद्यार्थी, शिक्षक आणि लोणावळा परिसरातील नागरिक एकत्रित जमा होऊन वंदे मातरम् गीताचे सामूहिक गायन करण्यात आले. लोणावळा परिसरातील जवळपास साडेचार हजार ते पाच हजार विद्यार्थ्यांनी वंदे मातरम् राष्ट्रीय गीत गायनामध्ये सहभाग नोंदवला.
      लोणावळा परिसरातील सर्वात मोठी समजली जाणारी व्ही.पी.एस हायस्कूल व द.पू. मेहता कनिष्ठ महाविद्यालयातील दीड हजार विद्यार्थी कार्यक्रमांमध्ये सहभागी झाले होते. 
     वंदे मातरम् राष्ट्रीय गीताचे सामूहिक गायन करण्याची प्रेरणा लोणावळा नगर परिषदेमध्येच जन्मास आली आणि त्याची अंमलबजावणी सुनियोजित पद्धतीने करण्यात आली. कार्यक्रमासाठी लोणावळा नगरपरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.साबळे साहेब, लोणावळा शहर आणि ग्रामीण पोलीस स्टेशनचे अधिकारी, विविध शाळेचे पदाधिकारी, प्राचार्य, मुख्याध्यापक,शिक्षक, सेवक, समाजसेवी संघटना आणि नागरिक मोठा संख्येने उपस्थित राहिले होते.
      नगरपरिषदेतर्फे उपस्थित शाळांचा सन्मान करण्यात आला. व्याख्याते श्री.गिरीष परवर्धन यांनी वंदे मातरम् गीताचा इतिहास सांगितला. उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले.
     कार्यक्रमाचे नियोजन श्री.योगेश कोठावदे यांनी केले तर श्री.संजय पालवे, सर्व शिक्षक आणि सेवकांनी मोलाचे सहकार्य केले.
      कार्यक्रमामध्ये नियामक मंडळ सदस्य तथा शाळा समिती अध्यक्ष श्री.भगवानभाऊ आंबेकर, शाळा समिती सदस्य श्री.धीरूभाई कल्याणजी, श्री.राजेश मेहता, प्राचार्य श्री.सुहास विसाळ, उपमुख्याध्यापक श्री.विजय रसाळ, उपप्राचार्य श्री.आदिनाथ दहिफळे, पर्यवेक्षक श्री.श्रीनिवास गजेंद्रगडकर, श्री.अनिल खामकर पर्यवेक्षिका श्रीमती अक्षता पाध्ये, शिक्षक आणि सेवक मोठ्या संख्येने उपस्थित राहिले.      

Popular posts from this blog

व्ही.पी.एस मध्ये ८०वा स्वातंत्र दिन साजरा

व्ही.पी.एस मध्ये दीप अमावस्या साजरी

विद्यार्थ्यांनी घेतला अध्यापनाचा अनुभव