व्ही.पी.एस मध्ये बालदिन उत्साहात साजरा

लोणावळा, संपादक : संजय पालवे 
     व्ही.पी.एस हायस्कूल व द.पू.मेहता कनिष्ठ महाविद्यालयामध्ये बालदिन उत्साहात साजरा करण्यात आला.
     स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती देशभरामध्ये बालदिन म्हणून साजरी करण्यात येते. यानिमित्तानेच प्रशालेच्या प्रकाश हॉलमध्ये विद्यार्थ्यांसाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. त्यामध्ये मनोगते, गाणी, गोष्टी, नृत्य आणि व्याख्यान यांचा प्रामुख्याने समावेश होता. 
     कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशालेचे जेष्ठ पर्यवेक्षक श्री.श्रीनिवास गजेंद्रगडकर होते. तसेच मंचावर ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती ज्योती डामसे, ज्येष्ठ शिक्षक श्री.देविदास खेडकर, श्री.पी.बी.राहिंज, श्री.संजय पालवे, श्री.वैभव सूर्यवंशी, श्रीमती सुनिता इथापे, श्रीमती संध्या रत्नाकर, श्रीमती रोहिणी देवरे उपस्थित होत्या.
     विद्यार्थ्यांनी कार्यक्रमांमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवला त्यांनी चाचा नेहरू विषयी माहिती सांगितली. सहभागी विद्यार्थ्यांमध्ये चि.विराज गिड्डे, कु.अदिती पवार, कु. दर्शना पालकर, कु. क्रिया गायकवाड, कु.जान्हवी कनोजे, कु.तन्वी कनोजे, कु.वेदिका मालुसरे आणि चि. ओम सोनवणे यांनी सहभाग घेतला. कला शिक्षक श्री.योगेश कोठावदे आणि जेष्ठ सेवक श्री.गजानन कदम यांनी देखील गायनामध्ये सहभाग घेतला.
     बाल दिनानिमित्त नियामक मंडळ अध्यक्षा डॉ. मृणालिनीताई गरवारे, कार्यवाह डॉ. सतीश गवळी, सहकार्यवाह श्री.विजय भुरके, नियामक मंडळ सदस्य तथा शाळा समिती अध्यक्ष श्री.भगवानभाऊ आंबेकर, प्रशालेचे प्राचार्य श्री.सुहास विसाळ, उपमुख्याध्यापक श्री. विजय रसाळ, उपप्राचार्य श्री.आदिनाथ दहिफळे, पर्यवेक्षक श्री.अनिल खामकर आणि पर्यवेक्षिका श्रीमती अक्षता पाध्ये यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. 
     कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.सोमनाथ ढुमणे,   प्रास्ताविक श्री.धनंजय काळे तर आभार श्री.वैभव सूर्यवंशी यांनी मांनले. शिक्षक मनोगतामध्ये श्री.संजय पालवे यांनी पंडित नेहरूं विषयी विशेष माहिती विद्यार्थ्यांना सांगितली .
       कार्यक्रमाचे नियोजन सास्कृतिक विभाग प्रमुख श्री. धनंजय काळे आणि श्री.योगेश कोठावदे यांनी केली तसेच श्री.संकेत कवडे, श्री.श्रीकांत म्हसकर आणि प्रशालेतील सेवक यांनी कार्यक्रमासाठी मोलाचे सहकार्य केले.

Popular posts from this blog

व्ही.पी.एस मध्ये ८०वा स्वातंत्र दिन साजरा

व्ही.पी.एस मध्ये दीप अमावस्या साजरी

विद्यार्थ्यांनी घेतला अध्यापनाचा अनुभव