विद्यार्थ्यांनी घेतला पर्यावरन संरक्षनाचा वसा
लोणावळा, संपादक:संजय पालवे
विद्या प्रसारिणी सभेच्या व्ही.पी.एस हायस्कूल व द.पू.मेहता कनिष्ठ महाविद्यालया मधील विद्यार्थ्यांनी वृक्ष लागवड करून पर्यावरण संरक्षणाचा वसा जपला.
व्ही.पी.एस प्रशालेमध्ये नेहमी विविध कार्यक्रम घेऊन विद्यार्थ्यांना नवीन नवीन अनुभव दिले जातात आणि संधी उपलब्ध करून दिल्या जातात. विद्यालयातील सहशिक्षक श्री.श्रीकांत म्हसकर यांनी विद्यार्थ्यांना पर्यावरण संरक्षनाचे धडे दिले आणि ‘झाडे लावा झाडे जगवा’ अंतर्गत उपक्रम घेतला.
लोणावळा जवळील वाकसई येथील व्ही.पी.एस इंग्लिश स्कूल परिसरामध्ये विद्यार्थ्यांनी जवळजवळ 130 वृक्षांची लागवड केली. वृक्ष लागवड करत असताना विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. प्रसंगी प्रशालेचे प्राचार्य श्री.सुहास विसाळ, उपमुख्याध्यापक श्री.विजय रसाळ, पर्यवेक्षक श्री.श्रीनिवास गजेंद्रगडकर, श्री.अनिल खामकर, श्रीमती अक्षता पाध्ये, जेष्ठ लिपिक श्री.कुंडलिक आंबेकर आणि सहशिक्षिका श्रीमती कल्याणी म्हसे उपस्थित होते.
नियामक मंडळ अध्यक्षा डॉ.मृणालिनीताई गरवारे, कार्यवाह डॉ.सतीश गवळी, सहकार्यवाह श्री.विजयजी भुरके आणि नियामक मंडळ सदस्य तथा शाळा समिती अध्यक्ष श्री.भगवानभाऊ आंबेकर यांनी उपक्रमाचे कौतुक केले.