संविधान दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन

लोणावळा, संपादक:संजय पालवे 
      विद्या प्रसारिणी सभेच्या व्ही.पी.एस हायस्कूल व द.पू.मेहता कनिष्ठ महाविद्यालयामध्ये 26 नोव्हेंबर संविधान दिन प्रशालेच्या मैदानावर उत्साहात साजरा करण्यात आला.   
    कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य श्री.सुहास विसाळ होते. प्रसंगी प्रशालेचे उपमुख्याध्यापक श्री.विजय रसाळ, जेष्ठ पर्यवेक्षक श्री.श्रीनिवास गजेंद्रगडकर, श्री.अनिल खामकर, पर्यवेक्षिका श्रीमती अक्षता पाध्ये, शिक्षक प्रतिनिधी श्रीमती स्नेहल कांबळे आणि शिक्षकेतर प्रतिनिधी श्री.सचिन थोरात, जेष्ठ लिपिक श्री.कुंडलिक आंबेकर उपस्थित होते.
      संविधान दिनानिमित्त विद्यार्थी मनोगते, शिक्षक मनोगत आणि नाटकांचा समावेश होता. प्रशालेतील विद्यार्थी चि.विराज गिड्डे, चि.राजकुमार पाटील, कु.दर्शना पालकर, कु.अदिती पवार, कु.क्रीया गायकवाड, कु.समृद्धी जगदाळे यांनी मनोगते सादर केली.
       जेष्ठ पर्यवेक्षक श्री.गजेंद्रगडकर यांनी आपल्या मार्गदर्शना मधून विद्यार्थ्यांना संविधानाचे महत्व समजावून सांगितले. श्री.योगेश कोठावदे यांनी संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन केले. प्रशालेतील विद्यार्थी यांनी नाट्यछटेद्वारे नागरिकाचे हक्क, कर्तव्य, नागरी कायदे याचे सादरीकरण केले. हरकचंद बाफना अध्यापक विद्यालयातील विद्यार्थी शिक्षिकांना सुंदर नाट्यछटा सादर केली.
      कार्यक्रमाचे नियोजन सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री. धनंजय काळे आणि श्री.योगेश कोठावदे यांनी केले. सूत्रसंचालन श्री.धनंजय काळे तर आभार श्री.संजय पालवे यांनी मानले. स्टेज सजावट आणि माईक व्यवस्था श्री.गजानन कदम आणि सेवक वर्ग यांनी केली. कार्यक्रमामध्ये शिक्षक, सेवक, आणि विद्यार्थी यांनी सहभाग घेतला.
      संविधान दिनानिमित्त नियामक मंडळ अध्यक्षा डॉ.मृणालिनी गरवारे, कार्यवाह डॉ.सतीश गवळी, सहकार्यवाह श्री.विजयजी भुरके नियामक मंडळ सदस्य तथा शाळा समिती अध्यक्ष श्री.भगवान भाऊ आंबेकर यांनी शिक्षक, सेवक आणि विद्यार्थांना शुभेच्छा दिल्या.


Popular posts from this blog

व्ही.पी.एस मध्ये ८०वा स्वातंत्र दिन साजरा

व्ही.पी.एस मध्ये दीप अमावस्या साजरी

विद्यार्थ्यांनी घेतला अध्यापनाचा अनुभव