महापरिनिर्वाण दिन साजरा करून वार्षिक क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन
लोणावळा, संपादक:संजय पालवे
विद्या प्रसारिणी सभेच्या व्ही.पी.एस हायस्कूल व द.
पू.मेहता कनिष्ठ महाविद्यालयामध्ये 6 डिसेंबर महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.
प्रशालेमध्ये आंतर शालेय वार्षिक क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. स्पर्धा उद्घाटन प्रसंगी प्राचार्य श्री.सुहास विसाळ, उपमुख्याध्यापक श्री विजय रसाळ, उपप्राचार्य श्री.आदिनाथ दहिफळे, पर्यवेक्षक श्री.श्रीनिवास गजेंद्रगडकर, पर्यवेक्षिका श्रीमती अक्षता पाध्ये, जेष्ठ लिपिक श्री.कुंडलिक आंबेकर, शिक्षकेतर प्रतिनिधी श्री.सचिन थोरात आणि पावर लिफ्टिंग स्पर्धा मधून यश संपादन करणाऱ्या तपश्या मते आणि प्रीती दुड्डे उपस्थित होत्या.
मान्यवरांच्या हस्ते मशाल प्रज्वलित करून सर्व संघाच्या संघनायकांकडे देऊन मैदानावर फिरवण्यात आली. प्रातिनिधिक स्वरूपामध्ये मान्यवरांच्या हस्ते खो - खो च्या सामन्याला सुरुवात करण्यात आली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य श्री.सुहास विसाळ यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी सर्व स्पर्धकांना खेळाचे नियम पाळण्याचे आणि पंचांचा निर्णय मान्य करण्याच्या सूचना दिल्या. प्रास्ताविक विभाग प्रमुख श्रीमती वैशाली तारु यांनी केले. शिक्षक पंच आणि विद्यार्थ्यांना शपथ श्री.ज्ञानेश्वर बुरांडे यांनी दिली तर उपस्थितांचे आभार श्री.संजय पालवे यांनी मानले.
कार्यक्रम पार पाडण्यासाठी श्री.भीमराव राऊत, श्रीमती रेवती बोके, श्री.गजानन कदम, प्रशालेतील शिक्षक आणि सेवकांनी मोलाचे सहकार्य केले.
शालेय क्रीडा स्पर्धेसाठी नियामक मंडळ अध्यक्षा डॉ. मृणालिनीताई गरवारे, कार्यवाह डॉ.सतीश गवळी, सहकार्यवाह श्री.विजयजी भुरके, नियामक मंडळ सदस्य तथा शाळा समिती अध्यक्ष श्री.भगवानभाऊ आंबेकर, शाळा समिती सदस्य श्री.धीरूभाई कल्याणजी आणि श्री. राजेश मेहता यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.