भव्य तालुकास्तरीय कनिष्ठ महाविद्यालतीन वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

लोणावळा, संपादक:संजय पालवे 
     विद्या प्रसारिणी सभेच्या व्ही.पी.एस हायस्कूल व द. पू. मेहता कनिष्ठ महाविद्यालया मध्ये कै.डॉ.गोवर्धन शिंगरे (बाबा) यांच्या स्मृतिप्रित्यर्थ भव्य तालुकास्तरीय कनिष्ठ महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.  
   स्पर्धेमध्ये मावळ तालुक्यामधील जवळपास पंधरा कनिष्ठ महाविद्यालयातील 51 स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदवला होता. स्पर्धेसाठी देशाची शान स्त्रीचा सन्मान, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा, गड संवर्धन युवकांचा सहभाग, विकास विकास म्हणजे तरी काय आणि मोबाईलचा वापर मारक की प्रेरक विषय देण्यात आले होते. 
     स्पर्धा प्रशालेच्या प्रकाश हॉलमध्ये पार पडली. स्पर्धेनंतर बक्षीस वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य श्री.सुहास विसाळ होते. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे नियामक मंडळ सदस्य तथा शाळा समिती अध्यक्ष श्री.भगवानभाऊ आंबेकर होते. प्रसंगी मंचावर नियामक मंडळ सदस्य श्री.अरविंदभाई मेहता, ॲड.संदीपजी अगरवाल, श्री.धीरूभाई कल्याणजी (शाळा समिती सदस्य), श्री.राजेशजी मेहता (शाळा समिती सदस्य), उपमुख्याध्यापक श्री.विजय रसाळ, उपप्राचार्य श्री.आदिनाथ दहिफळे, पर्यवेक्षक श्री.श्रीनिवास गजेंद्रगडकर, श्री.अनिल खामकर, पर्यवेक्षिका श्रीमती अक्षता पाध्ये, जेष्ठ लिपिक श्री.कुंडलिक आंबेकर, शिक्षक प्रतिनिधी श्रीमती स्नेहल कांबळे, शिक्षकेतर प्रतिनिधी श्री.सचिन थोरात उपस्थित होते. 
     वक्तृत्व स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक कु.अक्षता मोरे (व्ही.पी.एस हायस्कूल व द.पू.मेहता कनिष्ठ महाविद्यालय), द्वितीय क्रमांक कु.सृष्टी बोचरे (इंद्रायणी कनिष्ठ महाविद्यालय तळेगाव दाभाडे) आणि तृतीय क्रमांक कु.स्नेहा मलकट्टे (लिली कनिष्ठ महाविद्यालय मळवली) या स्पर्धकांनी क्रमांक पटकावले. त्याचबरोबर कु.परिमळा भंडारी आणि कु.कोमल बनसोडे (आदर्श कनिष्ठ महाविद्यालय तळेगाव दाभाडे) यांना उत्तेजनार्थ बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले.
     प्रमुख पाहुणे श्री.भगवानभाऊ आंबेकर यांनी आपल्या मनोगतामधून सहभागी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. तसेच बक्षीस पात्र विद्यार्थ्यांचे विशेष अभिनंदन केले. आजची स्पर्धा सहभागी स्पर्धकांसाठी किती महत्त्वाची आहे याची सर्वांना जाणीव करून दिली. श्री.संदीपजी अगरवाल यांनी देखील उपस्थित स्पर्धकांचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या. 
     स्पर्धेचे परीक्षण श्री.मोडक, श्री.पाटील आणि श्री.हरिभाऊ कुलकर्णी यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.धुमाळ आणि प्रास्ताविक श्री.कल्याण चौगुले यांनी केले. उपस्थित मान्यवरांचे आभार श्री.सचिन लांडगे यांनी मांडले.

Popular posts from this blog

व्ही.पी.एस मध्ये ८०वा स्वातंत्र दिन साजरा

व्ही.पी.एस मध्ये दीप अमावस्या साजरी

विद्यार्थ्यांनी घेतला अध्यापनाचा अनुभव