व्ही.पी.एस मध्ये सुमधुर संगीत कार्यक्रमाचे आयोजन
लोणावळा, संपादक : संजय पालवे
विद्या प्रसारिणी सभेच्या व्ही.पी.एस हायस्कूल व द. पू मेहता कनिष्ठ महाविद्यालयात प्रकाश हॉलमध्ये सुमधुर हिंदी आणि मराठी गाण्यांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी वर्षभर विविध कामांमध्ये व्यस्त असतात. कामातील व्यापामधून थोडी विश्रांती आणि विरंगुळा मिळण्यासाठी प्रशालेतर्फे सुपरहिट नवीन आणि जुन्या गाण्याची मेजवानी उपलब्ध करून दिली.
कार्यक्रमाची प्रेरणा श्रीमती संजीवनीताई आंबेकर यांच्याकडून मिळाली तर पुढाकार नियामक मंडळ सदस्य तथा शाळा समिती अध्यक्ष श्री.भगवानभाऊ आंबेकर यांनी घेतला.
कार्यक्रमाच्या नियोजनामागे शाळा समिती सदस्य श्री.राजेशजी मेहता यांचे मोलाचे योगदान होते. राजेशजी एक प्रसिद्ध गायक आहेत त्यांच्या विनंतीवरूनच सुप्रसिद्ध गायिका श्रीमती मनीषा निश्चल यांच्या सुमधुर वाणीतून गाणी ऐकण्याची संधी मिळाली.
कार्यक्रमासाठी नियामक मंडळ सदस्य तथा शाळा समिती अध्यक्ष श्री.भगवानभाऊ आंबेकर, नियामक मंडळ सदस्य ॲड.संदीपजी अगरवाल, शाळा समिती सदस्य आणि प्रसिद्ध गायक श्री.राजेशजी मेहता, श्री. धीरूभाई कल्याणजी, श्रीमती उमा मेहता (निवेदिता), प्राचार्य श्री.सुहास विसाळ, उपमुख्याध्यापक श्री.विजय रसाळ, बीसीएस कॉलेजचे प्राचार्य श्री.चंद्रशेखर भगत, पर्यवेक्षक श्री.श्रीनिवास गजेंद्रगडकर, श्री.अनिल खामकर, पर्यवेक्षिका श्रीमती अक्षता पाध्ये, ज्येष्ठ लिपिक श्री.कुंडलिक आंबेकर, शिक्षक प्रतिनिधी श्रीमती स्नेहल कांबळे, शिक्षकेतर प्रतिनिधी श्री.सचिन थोरात, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
गाण्यांना वाद्याची साथ श्री.अमर सय्यद (कीबोर्ड ), श्री.सागर घोडके (गिटार वादक), श्री.चंद्रशेखर गायकवाड (तबला, ढोलक, ढोलकी) आणि श्री.प्रज्वल गायकवाड ( ड्रम मशीन) यांनी दिली. कार्यक्रमाच्या तयारीसाठी कलाशिक्षक श्री.योगेश कोठावदे आणि सेवकांचे मोलाचे सहकार्य केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.सोमनाथ ढुमणे यांनी केले. प्रास्ताविक श्री.भगवानभाऊ आंबेकर यांनी तर श्री.विजय रसाळ यांनी पाहुण्याचा परिचय करून दिला आणि आभार मानले.