महावाचन चळवळी अंतर्गत ‘वाचू आनंद ’ उपक्रम साजरा

लोणावळा, संपादक:संजय पालवे 
     विद्या प्रसारिणी सभेच्या व्ही.पी.एस हायस्कूल व द. पू.मेहता कनिष्ठ महाविद्यालयामध्ये मुख्यमंत्री माझी शाळा आदर्श शाळा अंतर्गत ‘ वाचू आनंदे ’ उपक्रम प्रशालेच्या प्रकाश हॉलमध्ये आयोजित करण्यात आला.  

      कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशालेचे उपमुख्याध्यापक श्री.विजय रसाळ होते. तसेच मंचावर पर्यवेक्षिका श्रीमती अक्षता पाध्ये, ज्येष्ठ शिक्षक श्री. हरिभाऊ कुलकर्णी आणि शिक्षक प्रतिनिधी श्रीमती स्नेहलता कांबळे उपस्थित होते.
     कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते लक्ष्मीपूजनाने करण्यात आली. प्रशालेतील विद्यार्थिनी कु.आदिती पवार आणि कु.दर्शना पालकर यांनी सुंदर नाटुकली सादर केले. कु.सोनाक्षी पाटोळे, कु.प्रिया गायकवाड आणि कु.हर्षदा दळवी यांनी सुंदर शैलीमध्ये निबंध वाचन केले. 
     पर्यवेक्षिका श्रीमती अक्षता पाध्ये यांनी पीपीटी द्वारे वाचनाचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावले. श्री.विजय रसाळ यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगत मधून वाचन आणि जीवन यांचा मेळ कसा घालावा विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. मंचावर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सातवी आणि आठवी इयत्तेमधील सर्व तुकड्यांमधील विद्यार्थी प्रतिनिधींकडे वाचनासाठी पुस्तके आणि वर्गा वर्गात लावण्यासाठी तक्ते यांचे वितरण केले.
     कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती सुनिता बनकर यांनी केले. प्रास्ताविक श्री.शिवकुमार दहिफळे यांनी केले. ग्रंथपाल श्रीमती दिपाली गायखे यांनी पुस्तक संहिता विद्यार्थ्यांना समजावून सांगितली. उपस्थित मान्यवरांचे आभार श्रीमती सुनीता इथापे यांनी मांडले. 
     कार्यक्रम पार पाडण्यासाठी श्री.संजय पालवे, श्री. दिनेश परचंड, श्री.वैभव काब्दे, श्री.दत्तात्रय सुरवसे, श्री.रवींद्र माळी आणि सेवकवर्ग यांनी मोलाचे सहकार्य केले.
   नियामक मंडळ अध्यक्षा डॉ.मृणालिनीताई गरवारे, कार्यवाह डॉ.सतीश गवळी, सहकार्यवाह श्री.विजयजी भुरके, नियामक मंडळ सदस्य तथा शाळा समिती अध्यक्ष श्री.भगवानभाऊ आंबेकर, आणि प्राचार्य श्री.सुहास विसाळ यांनी कार्यक्रमाचे कौतुक केले.

Popular posts from this blog

व्ही.पी.एस मध्ये ८०वा स्वातंत्र दिन साजरा

व्ही.पी.एस मध्ये दीप अमावस्या साजरी

विद्यार्थ्यांनी घेतला अध्यापनाचा अनुभव