वार्षिक पारितोषिक वितरण आणि स्नेहसंमेलन संपन्न
लोणावळा, संपादक : संजय पालवे
विद्या प्रसारिणी सभेच्या व्ही.पी.एस हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयामध्ये वार्षिक पारितोषिक वितरण आणि स्नेहसंमेलन उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले.
शाळेचे स्नेहसंमेलन आणि वार्षिक पारितोषिक वितरण वर्षभरातील सर्व कार्यक्रमाचे सार होय. तीन दिवस चालणाऱ्या कार्यक्रमामध्ये स्नेहसंमेलन, वार्षिक पारितोषिक वितरण आणि स्नेह भोजन असे नियोजन असते.
पारितोषिक वितरण समारंभा मध्ये मागील वर्षी पाचवी ते बारावी पर्यंत विषयामध्ये आणि वर्गांमध्ये प्रथम आणि द्वितीय क्रमांक पटकावलेल्या विद्यार्थ्यांचा पाहुण्यांच्या हस्ते सत्कार आणि कौतुक करण्यात आले. इयत्ता दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षांमध्ये आणि विविध स्पर्धामध्ये घवघवीत यश संपादन करणाऱ्या विद्यार्थांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नियामक मंडळाच्या अध्यक्षा डॉ.मृणालिनीताई गरवारे होत्या. प्रमुख पाहुणे डॉ.सतीश देसाई, कार्यवाह डॉ.सतीश गवळी, सहकार्यवाह श्री.विजयजी भुरके, नियामक मंडळ सदस्य तथा शाळा समिती अध्यक्ष श्री.भगवानभाऊ आंबेकर, श्री.नितीन गरवारे, श्री.प्रमोद कुदळे, श्रीमती विशाखा भुरके, श्रीमती साधना कुदळे, नियामक मंडळ सदस्य श्री.अरविंभाई मेहता (शाला समिती अध्यक्ष व्ही.पी.एस मराठी प्राथमिक विद्यालय), ॲड.संदीप अगरवाल, श्री.धीरूभाई कल्याणजी, श्री.राजेशजी मेहता, श्री.गिरीश पारीख, श्रीमती उमाताई मेहता, श्रीमती देसाई मॅडम, श्री. जितुभाई कल्याणजी, नवनिर्वाचित नगरसेविका श्रीमती श्वेता गायकवाड, श्री.राजू खांडेभराड मंचावर उपस्थित होते.
प्राचार्य श्री.सुहास विसाळ, उपमुख्याध्यापक श्री. विजय रसाळ, उपप्राचार्य श्री.आदिनाथ दहिफळे, पर्यवेक्षक श्री.श्रीनिवास गजेंद्रगडकर, श्री.अनिल खामकर, पर्यवेक्षिका श्रीमती अक्षता पाध्ये, जेष्ठ लिपिक श्री.कुंडलिक आंबेकर, शिक्षक प्रतिनिधी श्रीमती स्नेहलता कांबळे, शिक्षकेतर प्रतिनिधी श्री.सचिन थोरात, श्रीमती कांबळे मॅडम(मॅनेजर पी.डी.सी.सी बँक), श्रीमती संजीवनी आंबेकर, श्री.श्रीराम कुलथेकर, श्री.बापू तारे, श्री.महेश केदार, श्री.सुनील म्हस्के,श्री.शुभम वाघमारे, उपस्थित होते.
व्ही.पी.एस चे स्नेहसंमेलन म्हणजे लोणावळा करांसाठी आनंदाचा विषय असतो. कार्यक्रमांमधून गणेशावंदना, देशभक्तीपर गीते, पौराणिक, ऐतिहासिक गाणी आणि तबलावादन अशा विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य श्री.सुहास विसाळ यांनी केले. पाहुण्यांचा परिचय श्री.राजेश मेहता तर अध्यक्षांचा परिचय श्री.विजय रसाळ यांनी केला. वार्षिक अहवाल वाचन श्रीमती कांबळे यांनी केले. प्रमुख पाहुण्यांनी आपल्या मनोगता मधून त्यांच्या बालपणीच्या आठवणी सांगून विद्यार्थ्यांची मने जिंकली. अध्यक्षीय मनोगतामधून श्रीमती गरवारे मॅडम यांनी शाळेच्या प्रगतीचा आलेख असाच उंचावत ठेवण्याचे आवाहन विद्यार्थी आणि शिक्षकांना केले. कार्यवाह श्री.गवळी यांनी पुरस्कार प्राप्त विद्यार्थी आणि शिक्षकांचे कौतुक केले. शाळा समिती अध्यक्ष श्री.भगवानभाऊ यांनी आपल्या मनोगता मधून शाळेमध्ये चालणाऱ्या विविध कार्यक्रमाची आणि विद्यार्थांच्या प्रगतीची माहिती उपस्थितांना दिली.
सांस्कृतिक कार्यक्रमाचे नियोजन समिती प्रमुख श्री. धनंजय काळे आणि श्री योगेश कोठावदे यांनी केले. सूत्रसंचालन श्री.सोमनाथ ढुमणे तर आभार श्री.गजेंद्रगडकर यांनी मानले. पुरस्कार प्राप्त विद्यार्थी आणि शिक्षकांचे यादी वाचन श्री.विठ्ठल खेडकर आणि श्री.संकेत कवडे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक, सेवक आणि स्काऊट आणि गाईड स्वयंसेवक यांचे मोलाचे सहकार्य लाभले.