व्ही.पी.एस मध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी
लोणावळा, संपादक:संजय पालवे
विद्या प्रसारिणी सभेच्या व्ही.पी.एस हायस्कूल व द पू मेहता कनिष्ठ महाविद्यालयामध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्रशालेचे प्राचार्य श्री. सुहास विसाळ होते. मंचावर उपमुख्याध्यापक श्री. विजय रसाळ, पर्यवेक्षक श्री.श्रीनिवास गजेंद्रगडकर, श्री. अनिल खामकर, पर्यवेक्षिका श्रीमती अक्षता पाध्ये, जेष्ठ लिपिक श्री.कुंडलिक आंबेकर, शिक्षक प्रतिनिधी श्रीमती स्नेहलता कांबळे, श्री.सचिन थोरात, सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री धनंजय काळे, श्री योगेश कोठावदे आणि श्री.रवींद्र माळी उपस्थित होते.
विद्यार्थिनी सुंदर वेशभूषेमध्ये कार्यक्रमासाठी उपस्थित होत्या. कु.प्रज्ञा जाधव, कु.तन्वी इंगवले, कु.अदिती पवार, कु. क्रीया गायकवाड आणि कु.तनिष्का मांजरे विद्यार्थिनींनी मनोगत व्यक्त केले. शिक्षक मनोगता मध्ये श्री.रवींद्र माळी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यांनी आपल्या मनोगतामधून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जीवनपट विद्यार्थ्यांसमोर मांडत विद्यार्थिनींनी भविष्यामध्ये उंच भरारी घ्यावी आणि शाळेचे आणि देशाचे नाव रोशन करण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.धनंजय काळे, प्रास्ताविक श्री संजय पालवे तर आभार श्रीमती स्नेहलता कांबळे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शिक्षक आणि सेवकांचे सहकार्य लाभले. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती निमित्त नियामक मंडळ अध्यक्षा डॉ.मृणालिनीताई गरवारे, कार्यवाह डॉ.सतीश गवळी, सहकार्यवाह श्री.विजयजी भुरके आणि नियामक मंडळ सदस्य तथा शाळा समिती अध्यक्ष श्री.भगवानभाऊ आंबेकर यांनी प्रशालेतील विद्यार्थिनी आणि महिला शिक्षिकांना शुभेच्छा दिल्या.