७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

लोणावळा, संपादक:संजय पालवे 
     विद्या प्रसारिणी सभेच्या व्ही.पी.एस हायस्कूल व द.पू. मेहता कनिष्ठ महाविद्यालयामध्ये ७७व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.    
    ध्वजारोहण प्रसंगी मंचावर नियामक मंडळ सदस्य तथा शाळा समिती अध्यक्ष श्री.भगवानभाऊ आंबेकर, शाळा समिती सदस्य श्री.धीरूभाई कल्याणजी, श्री.राजेशजी मेहता, प्राचार्य श्री.सुहास विसाळ, उपप्राचार्य श्री.आदिनाथ दहिफळे, श्री.चंद्रशेखर भगत (प्राचार्य बीसीएस कॉलेज), उपमुख्याध्यापक श्री.विजय रसाळ, पर्यवेक्षक श्री.श्रीनिवास गजेंद्रगडकर, श्री.अनिल खामकर, पर्यवेक्षिका श्रीमती अक्षता पाध्ये, श्री.दत्तात्रय पोटे (मराठी प्राथमिक विद्यालय मुख्याध्यापक),
 श्रीमती सविता सिंग, श्रीमती अनुजा गोसावी, श्री दत्ता गोसावी, श्री.कुंडलिक आंबेकर(जेष्ठ लिपिक), श्री.सचिन थोरात(शिक्षकेतर प्रतिनिधी), श्रीमती प्रीती चुडासमा, श्रीमती अन्नपूर्णा सूर्यवंशी उपस्थित होते.    
    ध्वजारोहण करण्याचा सन्मान व्ही.पी.एस प्रांगणातील विविध शाखेमधील सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर असणाऱ्या कर्मचाऱ्यांना मिळतो. यावर्षीचा सन्मान व्ही.पी.एस हायस्कूल मधील श्रीमती अनुजा गोसावी आणि व्ही.पी.एस प्राथमिक विद्यालयातील सेवक श्री.दत्ता गोसावी यांना प्राप्त झाला.
     श्रीमती अनुजा गोसावी यांनी आपल्या मनोगता मधून विद्यार्थ्यांना सुजाण नागरिक बनण्याचे आवाहन केले. अध्यक्षीय मनोगतामध्ये श्री.भगवानभाऊ आंबेकर यांनी प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व विद्यार्थ्यांना सांगितले तसेच भविष्यात देशाच्या प्रगतीमध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग किती महत्वाचा आहे हे समजावले.
     प्रसंगी सादर करण्यात आलेल्या कार्यक्रमांमध्ये स्काऊट गाईड आणि ज्युनिअर कॉलेज विद्यार्थी यांच्याकडून राष्ट्रीय ध्वजाला तसेच उपस्थित मान्यवरांना मानवंदना देण्यात आली. त्यानंतर देशभक्तीपर गीतावर कवयत सादर करण्यात आली. मॉन्टेसरी, प्राथमिक विद्यालयातील, हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी सामूहिक कवायत आणि देशभक्तीपर गीते सादर केली. 
     कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीमती रेवती बोके यांनी केले. सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री.धनंजय काळे आणि श्री.योगेश कोठावदे यांनी कार्यक्रमांसाठी विद्यार्थ्यांची तयारी करून घेतली. स्काऊट गाईड परेड आणि वाद्यपदकाची तयारी श्री.संजय पालवे, श्री.ज्ञानेश्वर बुरांडे, श्री.शीतलकुमार सुतार आणि श्री.मयूर विटे, श्री.श्रीकांत म्हसकर, श्रीमती किरण म्हस्के आणि स्वाती व्हरांबळे यांनी केली. संविधान उद्देशिकेचे वाचन  श्री.भीमराव राऊत यांनी केले.
     कार्यक्रमाची तयारी श्री.गजानन कदम, श्री मुकुंद जगताप, श्री.सिताराम घारे, श्री.प्रकाश आढाव, श्री.मयूर पवार आणि श्री सचिन गवळी यांनी केली.

Popular posts from this blog

व्ही.पी.एस मध्ये ८०वा स्वातंत्र दिन साजरा

व्ही.पी.एस मध्ये दीप अमावस्या साजरी

विद्यार्थ्यांनी घेतला अध्यापनाचा अनुभव