बारावी बोर्ड परीक्षेसाठी विद्यार्थी आणि पालकांची लगबग

लोणावळा, संपादक:संजय पालवे,
     महाराष्ट्र राज्य परीक्षा मंडळ यांच्या कडून दहावी आणि बारावी साठी बोर्ड परीक्षेचे आयोजन करण्यात येते. यंदा बारावी बोर्ड परीक्षा 10 फेब्रुवारी पासून सुरू झाली. 
     विद्या प्रसारिणी सभेचे व्ही.पी.एस हायस्कूल व द पू मेहता कनिष्ठ महाविद्यालय मावळ तालुक्यातील एकमेव मोठे केंद्र म्हणून ओळखले जाते. यंदा परीक्षेसाठी 1353 विद्यार्थी बसले आहेत. 
    परीक्षा भयमुक्त आणि दबावरहित होण्यासाठी शालेय प्रशासनाने प्रयत्न केले. शालेय प्रशासनांकडून परीक्षार्थींचे स्वागत गुलाब पुष्प देऊन करण्यात आले. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना बैठक क्रमांक शोधून देण्यासाठी प्रशालेतील प्राध्यापक आणि सेवक यांनी मोलाची भूमिका पार पाडली.
     परीक्षा मंडळाकडून दरवर्षी महाराष्ट्रातील सर्व परीक्षा केंद्र कॉपी मुक्त करण्यासाठी प्रयत्न केला जातो. व्ही.पी.एस परीक्षा केंद्र नेहमी कॉपी मुक्त केंद्र म्हणून ओळखले जाते. त्यामध्ये आणखी भर म्हणून शाळा प्रशासन कडून सर्व परीक्षा हॉल मध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत.
     परीक्षा केंद्रावरती विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी नियामक मंडळ सदस्य तथा शाळा समिती अध्यक्ष श्री. भगवानभाऊ आंबेकर, उपमुख्याध्यापक श्री.विजय रसाळ, उपप्राचार्य, केंद्र संचालक श्री.आदिनाथ दहिफळे, ज्येष्ठ लिपिक श्री.कुंडलिक आंबेकर आणि श्री.देशमुख सर उपस्थित होते. 
    प्राचार्य श्री.सुहास विसाळ, पर्यवेक्षक श्री.श्रीनिवास गजेंद्रगडकर, श्री.अनिल खामकर, पर्यवेक्षिका श्रीमती अक्षता पाध्ये यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. केंद्र उपसंचालक श्री.कल्याण चौघुले आणि श्री.बाळू पिंगट हे काम पाहत आहेत. परीक्षार्थी संख्या जास्त असल्यामुळे श्री.सचिन लांडगे आणि सहकारी शिक्षकांनी विद्यार्थांना मार्गदर्शन केले.
     शाळा प्रशासनाच्या उत्तम नियोजनासाठी नियामक मंडळ अध्यक्षा डॉ.मृणालिनी गरवारे, कार्यवाह डॉ. सतीश गवळी, सहकार्यवाह श्री.विजयजी भुरके आणि नियामक मंडळ सदस्य तथा शाळा समिती अध्यक्ष श्री.भगवानभाऊ आंबेकर यांनी कौतुक केले.
     

Popular posts from this blog

व्ही.पी.एस. हायस्कूलमध्ये पारंपरिक महाभोंडल्याचा उत्साहात जल्लोष

व्ही.पी.एस मध्ये दीप अमावस्या साजरी

व्ही.पी.एस मध्ये ८०वा स्वातंत्र दिन साजरा