छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरा
लोणावळा, संपादक:संजय पालवे
विद्या प्रसारिणी सभेच्या व्ही.पी.एस हायस्कूल व द. पू.मेहता कनिष्ठ महाविद्यालयामध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
छत्रपती शिवाजी महाराज जयंती भारतभर नव्हे तर जगभरामध्ये मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते. त्यानिमित्त ठिकठिकाणी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन, पोवाडे गायन करून महाराजांच्या कार्याचे आणि दूरदृष्टीकोणाचे वर्णन केले जाते.
राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक संस्था मध्ये मिरवणुका काढण्यात येतात. गड किल्ल्यावरून ज्योत आणली जाते. राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज आणि मावळ्यांच्या रूपामध्ये तरुण आणि बालक सहभागी होतात.
प्रशालेमध्ये उपमुख्याध्यापक श्री.विजय रसाळ, पर्यवेक्षक श्री.श्रीनिवास गजेंद्रगडकर, श्री.अनिल खामकर, पर्यवेक्षिका श्रीमती अक्षता पाध्ये, शिक्षक प्रतिनिधी श्रीमती स्नेहलता कांबळे, शिक्षकेतर प्रतिनिधी श्री.सचिन थोरात, श्रीमती अनुजा गोसावी, श्रीमती वैशाली तारु आणि श्रीमती मनिषा खेडकर यांच्या हस्ते महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून पताका आणि ढोल ताशांच्या गजरात मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली.
मिरवणूक संपन्न झाल्यानंतर कु.आदिती पोवार, कु. पाटोळे, कु.पूनम गलधर, चि. रुद्र शिंदे, चि.ओम सोनूने चि.रुद्र इंगुळकर आणि सहकाऱ्यांनी आपली मनोगते आणि पोवाडे सादर केली. शिक्षक मनोगता मधून श्री.दिनेश परचंड यांनी मोजक्या शब्दामध्ये आपले मनोगत व्यक्त करत महाराजांचा महिमा सांगितला.
कार्यक्रमाचे नियोजन समिती प्रमुख श्री.धनंजय काळे आणि श्री.योगेश कोठावदे यांनी केले. सूत्रसंचालन श्री.सोमनाथ ढुमणे यांनी केले. मिरवणुकी साठी पताका आणि ढोल पथकाची तयारी श्री.श्रीकांत म्हसकर आणि श्री.संकेत कवडे यांनी केली. कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी श्री.महेश चोनगे, श्री.विक्रम शिंदे, श्री.संजय पालवे, श्री.वैभव सूर्यवंशी सेवक श्री. गजानन कदम, श्री.प्रकाश आढाव श्री.सचिन गवळी आणि शिक्षकांनी सहकार्य केले. कार्यक्रमासाठी माजी कलाशिक्षक श्री.चंद्रकात जोशी उपस्थित होते.
शिवजयंती निमित्त नियामक मंडळ अध्यक्षा डॉ.मृणालिनी गरवारे, कार्यवाह डॉ.सतीश गवळी, सहकार्यवाह श्री.विजयजी भुरके, नियामक मंडळ सदस्य तथा शाळा समिती अध्यक्ष श्री.भगवानभाऊ आंबेकर, प्राचार्य श्री.सुहास विसाळ, उपप्राचार्य श्री.आदिनाथ दहिफळे, ज्येष्ठ लिपिक श्री.कुंडलिक आंबेकर यांनी शुभेच्छा दिल्या.