कै.गो.व्यं.शिंगरे उर्फ बाबा यांच्या तृतीय स्मृतिदिनानिमित्त भव्य आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन
लोणावळा, संपादक : संजय पालवे
विद्या प्रसारिणी सभेच्या व्ही.पी.एस हायस्कूल व द.पू.मेहता कनिष्ठ महाविद्यालयामध्ये नियामक मंडळाचे माजी अध्यक्ष कै.गो.व्यं.शिंगरे उर्फ बाबा यांच्या तृतीय स्मृतिदिनानिमित्त विद्यार्थांसाठी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले.
मुंबई येथील प्रसिद्ध नानावटी रुग्णालय आणि लायन्स क्लब ऑफ सुप्रीमो लोणावळा यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य तपासणीसाठी नानावटी रुग्णालयामधून जवळपास पन्नास डॉक्टर आणि सहकारी आरोग्य शिबिरासाठी प्रशालेमध्ये
उपस्थित होते.
आरोग्य तपासणी करण्याबरोबरच विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना उपस्थित डॉक्टरांनी मार्गदर्शन केलं. त्याचबरोबर विविध खेळ,कौशल्य आणि इम्युनिटी पावर याची देखील चाचणी डॉक्टरांमार्फत करण्यात आले.
कै.गो.व्यं.शिंगरे उर्फ बाबा यांच्या तृतीय स्मृतिदिनानिमित्त प्रतिमा पूजन आणि आरोग्य शिबिराचे उद्घाटन नियामक मंडळ सदस्य तथा शाळा समिती अध्यक्ष श्री.भगवानभाऊ आंबेकर यांच्या हस्ते करण्यात आले.प्रसंगी प्राचार्य श्री.सुहास विसाळ, उपमुख्याध्यापक श्री.विजय रसाळ, उपप्राचार्य श्री.आदिनाथ दहिफळे, पर्यवेक्षक श्री.अनिल खामकर, पर्यवेक्षिका श्रीमती अक्षता पाध्ये, शिक्षकेतर प्रतिनिधी श्री.सचिन थोरात, मुख्य लिपिक श्री.कुंडलिक आंबेकर, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रशालेमध्ये घेण्यात आलेल्या आरोग्य शिबिराचे कौतुक नियामक मंडळ अध्यक्षा डॉ.मृणालिनी गरवारे, कार्यवाह डॉ.सतीश गवळी आणि सहकार्यवाह श्री.विजयजी भुरके यांनी कौतुक केले.