क्रीडा पारितोषिक वितरण समारंभ संपन्न
लोणावळा, संपादक : संजय पालवे
विद्या प्रसारिणी सभेच्या व्ही.पी.एस हायस्कूल व द.पू.मेहता कनिष्ठ महाविद्यालयामध्ये आंतर शालेय वार्षिक क्रीडा स्पर्धा पारितोषिक वितरण समारंभ प्रशालेमध्ये संपन्न झाला.
दरवर्षी शाळेमध्ये अंतर वर्गीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन डिसेंबर महिन्यात करण्यात येते. त्यामध्ये वैयक्तिक आणि सांघिक स्पर्धेमध्ये यश संपादन करणाऱ्या स्पर्धकांना पारितोषिके देऊन गौरविण्यात येते. जवळजवळ १७० वैयक्तिक आणि सांघिक बक्षिसांचे वितरण मान्यवरांच्या तसेच उपस्थित शिक्षकांच्या हस्ते करण्यात आले.
समारंभाच्या अध्यक्ष स्थानी नियामक मंडळ सदस्य तथा शाळा समिती अध्यक्ष श्री.भगवानभाऊ आंबेकर होते. प्रमुख पाहुणे श्री.धीरूभाई कल्याणजी उपस्थित होते. मंचावर प्रशालेचे उपमुख्याध्यापक श्री.विजय रसाळ, पर्यवेक्षिका श्रीमती अक्षता पाध्ये, शिक्षकप्रतीनिधी श्रीमती स्नेहलता कांबळे, शिक्षकेतर प्रतिनिधी श्री.सचिन थोरात, क्रीडा प्रमुख श्रीमती वैशाली तारू आणि ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती अनुजा गोसावी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशालेचे पर्यवेक्षिका श्रीमती अक्षता पाध्ये यांनी केले. उपमुख्याध्यापक श्री.विजय रसाळ यांनी बक्षीस पात्र विद्यार्थ्यांचे कौतुक केले. अध्यक्षीय मनोगता मधून श्री.भगवानभाऊ यांनी बक्षीस पात्र विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत शाळेमध्ये उपलब्ध असणाऱ्या सर्व खेळाच्या सुविधांचा लाभ विद्यार्थ्यांनी घ्यावा असेही नमूद केले.
नियामक मंडळ अध्यक्षा डॉ.मृणालिनी गरवारे, कार्यवाह डॉ.सतीश गवळी, सहकार्यवाह श्री. विजयजी भुरके आणि प्राचार्य श्री सुहास विसाळ यांनी बक्षीस पात्र विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
विद्यार्थांनी एनएमएमएस परीक्षेमध्ये यश संपादन केल्याबद्दल समिती प्रमुख श्री.मोहनराव ढाणे आणि एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट परीक्षेमधील यशाबद्दल श्री.महेश चोणगे, श्री योगेश कोठावदे आणि श्री.विक्रम शिंदे यांचे कौतुक श्री.भगवानभाऊ आंबेकर यांनी केले.
सूत्रसंचालन श्री.ज्ञानेश्वर बुरांडे यांनी केला. बक्षीस पात्र विद्यार्थ्यांचे यादी वाचन क्रीडा शिक्षक श्री.भीमराव राऊत आणि श्रीमती वैशाली तारू यांनी तर मान्यवरांचे आभार श्रीमती स्नेहलता कांबळे यांनी मांनले.