व्ही.पी.एस इंग्लिश टीचिंग स्कूल मुख्याध्यापक पदी श्री.अनिकेत रासकर यांची पदोन्नती

लोणावळा, संपादक : संजय पालवे 
     विद्या प्रसारिणी सभेच्या व्ही.पी.एस इंग्लिश टीचिंग स्कूल लोणावळा प्रशालेच्या मुख्याध्यापक पदावर श्री.अनिकेत रासकर यांची पदोन्नती.  
    शिक्षण विभागाने प्रसिद्ध केलेल्या नवीन मार्गदर्शक सूचनेनुसार शासकीय, अनुदानित आणि खासगी अनुदानित शाळांमध्ये महा टीईटी किंवा सीटीईटी पात्र शिक्षकांना नियमानुसार पदोन्नती देण्याची लगबग सुरू झाली आहे.
    टीईटी पात्रतेची अट सर्वच माध्यमांच्या शाळेसाठी सरसकट लागू केल्यामुळे काही शिक्षकांना याचा फायदा तर काही शिक्षकांचे नुकसान होताना दिसत आहे. 
     श्री.अनिकेत रासकर व्ही.पी.एस इंग्लिश टीचिंग स्कूल लोणावळा प्रशालेमध्ये गेली 16 वर्ष अध्यापनाचे कार्य करत आहे. अध्यापना बरोबरच त्यांनी विविध समित्यांचे काम पाहिले आहे. तसेच ऑनलाइन कामाचाही त्यांना प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांच्या अनुभवाचा फायदा मुख्याध्यापक पदावरून कार्य करतांना शाळा, विद्यार्थी आणि शिक्षकांना नक्कीच होईल. 
      मुख्याध्यापक पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर त्यांनी आपली प्रतिक्रिया देताना असे नमूद केले की, सभेने दिलेल्या जबाबदारीला खरे उतरण्याचा मी नक्की प्रयत्न करेल, त्याचबरोबर शाळेच्या आणि विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी भरपूर कष्ट करण्याची तयारी त्यांनी दर्शवली.
     मुख्याध्यापकाचा पदभार स्वीकारल्यानंतर नियामक मंडळ अध्यक्षा डॉ.मृणालिनी गरवारे, कार्यवाह डॉ.सतीश गवळी, सहकार्यवाह श्री.विजयजी भुरके, व्ही.पी.एस हायस्कूल व द.पू.मेहता कनिष्ठ महाविद्यालय शाळा समिती अध्यक्ष श्री.भगवानभाऊ आंबेकर, प्राचार्य श्री.सुहास विसाळ, उपमुख्याध्यापक श्री.विजय रसाळ, उपप्राचार्य श्री.आदिनाथ दहिफळे, ज्येष्ठ लिपिक श्री.कुंडलिक आंबेकर, वरिष्ठ लिपिक श्री. सचिन थोरात यांनी नवनियुक्त मुख्याध्यापक श्री.अनिकेत रासकर यांना पुष्पगुच्छ देऊन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Popular posts from this blog

व्ही.पी.एस मध्ये ८०वा स्वातंत्र दिन साजरा

व्ही.पी.एस मध्ये दीप अमावस्या साजरी

विद्यार्थ्यांनी घेतला अध्यापनाचा अनुभव