डाबर ने विद्यार्थ्यांना केले कुल-कुल

लोणावळा, संपादक : संजय पालवे 
     विद्या प्रसारिणी सभेच्या व्ही.पी.एस हायस्कूल व द.पू.मेहता कनिष्ठ महाविद्यालयातील एक हजार पाचशे विद्यार्थ्यांना डाबर कंपनीने ऐन उन्हाळ्याच्या तोंडावर ज्यूसचे वाटप करून कुल-कुल केले. 
     आंतर भारतीय बालग्रामच्या वतीने श्री.सतीश मून (संस्थापक आंतर भारतीय बालग्राम) आणि श्री.योगिता मून (सेक्रेटरी आंतर भारतीय बालग्राम) यांच्या वतीने डाबर कंपनीतर्फे ज्यूसचे वाटप विद्यार्थ्यांना करण्यात आले. 
     नुकतेच उन्हाळ्याचे चटके बसू लागले असून  विद्यार्थ्यांना मिळालेल्या ज्यूसने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. श्री.कुंडलिक आंबेकर (वरिष्ठ लिपीक) आणि श्री.सुरेश चव्हाण (एच.आर मॅनेजर आंतर भारतीय बालग्राम) यांच्या प्रयत्नाने एक लिटरपी ज्यूसचे पाऊच विद्यार्थ्यांना वितरित केले. 
     ज्यूसचे वाटप करतेवेळी प्रशालेचे प्राचार्य श्री.सुहास विसाळ, उपमुख्याध्यापक श्री.विजय रसाळ, उपप्राचार्य श्री.आदिनाथ दहिफळे, पर्यवेक्षक श्री.अनिल खामकर आणि पर्यवेक्षिका श्रीमती अक्षता पाध्ये उपस्थित होते.
     ज्यूसचे वाटप केल्याबद्दल नियामक मंडळ अध्यक्षा डॉ.मृणालिनी गरवारे, कार्यवाह डॉ.सतीश गवळी, सहकार्यवाह श्री.विजयजी भुरके आणि नियामक मंडळ  सदस्य तथा शाळा समिती अध्यक्ष श्री.भगवानभाऊ आंबेकर यांनी आंतर भारतीय बालग्रामचे आणि डाबर कंपनीचे आभार मानले.

Popular posts from this blog

व्ही.पी.एस. हायस्कूलमध्ये पारंपरिक महाभोंडल्याचा उत्साहात जल्लोष

व्ही.पी.एस मध्ये दीप अमावस्या साजरी

व्ही.पी.एस मध्ये ८०वा स्वातंत्र दिन साजरा