व्ही.पी एस.कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट केंद्रामध्ये विविध कोर्सेस सुरु

    विद्या प्रसारिणी सभेच्या व्ही.पी.एस हायस्कूल व द पू मेहता कनिष्ठ महाविद्यालयामध्ये चालवण्यात येत असलेल्या कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट मध्ये विविध कॉम्प्युटर कोर्स करण्याची संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात येत आहे. 
    शासनाने उपलब्ध करून दिलेला एम.एस. ए.सी.आय.टी कोर्स इन्स्टिट्यूट मध्ये सुरू करण्यात आला. सदर कोर्सचा लाभ प्रशालेमधील दहा शिक्षकांनी घेतला. नुकत्याच झालेल्या परीक्षेमध्ये कोर्समध्ये सहभागी असलेल्या सर्व शिक्षकांनी यश संपादन केले आणि आपले संगणकाचे ज्ञान अद्यावत केले.
व्ही.पी.एस कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट अधिकृत शिक्षण केंद्रा मार्फत CSR उपक्रमांतर्गत Globant India Pvt.Ltd. यांच्या सहकार्याने IIMV व MKCL यांच्या संयुक्त विद्यमाने राबवण्यात आलेला उपक्रम यशस्वीरीतीने पारपडला.
    कोर्ससाठी सहभागी झालेल्या शिक्षक आणि विद्यार्थ्यांना संगणक शिक्षिका श्रीमती दिपाली ठाकर, श्रीमती रूपाली मोरे आणि श्रीमती नंदा देसाई यांनी उत्तम मार्गदर्शन केले. त्याबद्दल इन्स्टिट्यूटच्या प्रमुख श्रीमती सविता सिंह यांनी सर्वांचे कौतुक केले.
     कोर्स पूर्ण करण्यासाठी प्रशालेचे प्राचार्य श्री.सुहास विसाळ, उपमुख्याध्यापक श्री.विजय रसाळ, उपप्राचार्य श्री.आदिनाथ दहिफळे, पर्यवेक्षक श्री.श्रीनिवास गजेंद्रगडकर, श्री.अनिल खामकर ,श्रीमती अक्षता पाध्ये आणि मुख्य लिपिक श्री.कुंडलिक आंबेकर यांनी मार्गदर्शन आणि सहकार्य केले.
      नवीन परंतु महत्त्वपूर्ण कोर्ससाठी सहभागी झालेले शिक्षक तसेच त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या संगणक शिक्षिकांचे आणि संगणक विभागप्रमुख श्रीमती सविता सिंह यांचे नियामक मंडळ अध्यक्षा डॉ.मृणालिनी गरवारे, कार्यवाहक डॉ.सतीश गवळी, सहकार्यवाह श्री. विजयजी भुरके आणि नियामक मंडळ सदस्य तथा शाळा समिती अध्यक्ष श्री. भगवानभाऊ आंबेकर यांनी कौतुक केले.

Popular posts from this blog

व्ही.पी.एस मध्ये ८०वा स्वातंत्र दिन साजरा

व्ही.पी.एस मध्ये दीप अमावस्या साजरी

विद्यार्थ्यांनी घेतला अध्यापनाचा अनुभव