महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन साजरा करतांना ‘वसुंधरा बचाव' चे आवाहन

लोणावळा, संपादक : संजय पालवे 
     विद्या प्रसारिणी सभेच्या व्ही.पी.एस हायस्कूल व द. पू. मेहता कनिष्ठ महाविद्यालयामध्ये महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन साजरा करण्यात आला.   
    कार्यक्रमासाठी नियामक मंडळ सदस्य तथा शाळा समिती अध्यक्ष श्री.भगवानभाऊ आंबेकर, नियामक मंडळ सदस्य ॲड.संदीपजी अगरवाल, शाळासमिती सदस्य श्री.धीरूभाई कल्याणजी, श्री.राजेशजी मेहता मान्यवर उपस्थित होते.
     महाराष्ट्र दिनाचे औचित साधन प्रमुख मान्यवरांच्या हस्ते दरवर्षी प्रशालेमध्ये प्रकाशित होणारे ‘ज्ञानांकुर’ नियतकालीकाचे प्रकाशन करण्यात आले तसेच  प्रत्येक इयत्ता मधून प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांचा सन्मान प्रमाणपत्र आणि लेखणी देऊन करण्यात आला.
      महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वज पूजन आणि ध्वजारोहणाचा मान सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेले उपमुख्याध्यापक श्री.विजय रसाळ यांना मिळाला. त्यानंतर प्रमुख मनोगते झाली यामध्ये उपमुख्याध्यापक श्री.विजय रसाळ यांनी महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाचे महत्त्व सांगितले. अध्यक्षीय मनोगतामध्ये शाळा समिती अध्यक्ष श्री.भगवानभाऊ आंबेकर यांनी महाराष्ट्र दिनानिमित्त उपस्थित विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांना वसुंधरा बचावचे आवाहन केले. त्याचबरोबर जास्तीत जास्त वृक्ष लागवड करून आणि पाणी वाचून आपण आपला महाराष्ट्र आणि देशाला नव्हे तर जगाला वाचू शकतो त्याची आठवण करून दिली.
     प्रसंगी मंचावर प्राचार्य श्री.सुहास विसाळ, उपप्राचार्य श्री.आदिनाथ दहिफळे, पर्यवेक्षक श्री.अनिल खामकर, पर्यवेक्षिका श्रीमती अक्षता पाध्ये, बीएसएस प्राचार्य श्री.चंद्रशेखर भगत, मुख्य लिपिक श्री.कुंडलिक आंबेकर, शिक्षक प्रतिनिधी श्रीमती स्नेहलता कांबळे, शिक्षकेतर प्रतिनिधी श्री.सचिन थोरात, इंग्लिश टीचिंग स्कूलचे मुख्याध्यापक श्री.अनिकेत रासकर, मराठी प्राथमिक स्कूलचे मुख्याध्यापिका श्रीमती नरके, श्रीमती सूर्यवंशी उपस्थित होते.
     कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती रेवती बोके आणि श्रीमती वैशाली तारु यांनी केले. राष्ट्रगीत, राज्यगीत आणि ध्वजगीत याचे गायन श्री.धनंजय काळे यांनी केले. कालशिक्षक श्री.महेश चोणगे यांनी सुंदर महाराष्ट्राची प्रतिकृती शाळेचा दर्शनी फलकावर रेखाटणी.

Popular posts from this blog

व्ही.पी.एस. हायस्कूलमध्ये पारंपरिक महाभोंडल्याचा उत्साहात जल्लोष

व्ही.पी.एस मध्ये दीप अमावस्या साजरी

व्ही.पी.एस मध्ये ८०वा स्वातंत्र दिन साजरा